मनासारखे डायमंड आणि मोत्याचे दागिने, लग्नासाठी डोंबिवलीत करा खरेदी, किंमत फक्त 100 रुपयांपासून
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्यामुळे बेन्टेक्स आणि इमिटेशन ज्वेलरीला अधिक मागणी आहे. यामध्ये अगदी साऊथ इंडियन लूकसाठी लागणाऱ्या दागिन्यांपासून ते अमेरिकन डायमंडपर्यंत सगळ्याचा ट्रेंड सुरू आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
डोंबिवली : सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्यामुळे बेन्टेक्स आणि इमिटेशन ज्वेलरीला अधिक मागणी आहे. यामध्ये अगदी साऊथ इंडियन लूकसाठी लागणाऱ्या दागिन्यांपासून ते अमेरिकन डायमंडपर्यंत सगळ्याचा ट्रेंड सुरू आहे. डोंबिवलीतील कृष्णा आर्ट्स या दुकानात तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये नवरीचे दागिने मिळतील. पण यांच विशेष वैशिष्ट्य म्हणजे इथे गिऱ्हाईकांच्या मनाप्रमाणे इमिटेशन आणि डायमंड ज्वेलरी बनवून सुद्धा दिली जाते. यामध्ये अगदी डायमंडपासून ते मोत्यांपर्यंत सगळ्या दागिन्यांचा समावेश आहे.
advertisement
कृष्णा आर्ट्समध्ये तुम्हाला 500 हून अधिक प्रकारच्या नथी मिळतील. यामध्ये अगदी कारवारी नथ, काशीबाई नथ, हिऱ्याची नथ, पेशवाई नथ, डायमंड नथ असे सगळे प्रकार मिळतील. गळ्यात घालण्यात आलेल्या कंठीहारांमध्ये सुध्दा खूप सुंदर प्रकार मिळतील. यात लांब हार सुध्दा ऊपलब्ध आहेत. यांची किंमत साधारण 300 ते 400 रुपयांपासून सुरू होते. ड्रेसेस किंवा घागऱ्यावर घालण्यासाठीचे डिझायनेबल हार सुध्दा मिळतील. इयर पिनमध्ये सुद्धा खूप चांगल्या व्हरायटी आहेत. यात अगदी मोत्यांपासून इतरही सगळया गोष्टी मिळतील. या कृष्णा आर्ट्समध्ये मिळणाऱ्या अंगठ्यापाहून तर तुम्ही थक्क व्हाल. इतक्या त्या सुंदर दिसतात. ह्या सुंदर अंगठ्यांची किंमत फक्त 100 रुपये आहे.
advertisement
नेकलेसच्या सेटमध्ये सुद्धा तुम्हाला खूप व्हरायटी मिळतील. यामध्ये साउथ इंडियन लूक जर तुम्हाला साखरपुडा किंवा लग्नात करायचा असेल, तर त्यासाठी अगदी उत्तम ही ज्वेलरी आहे. या पूर्ण सेटमध्ये तुम्हाला अगदी लॉंग नेकलेसपासून ते इयरिंग्स आणि त्यासोबतच बिंदी सुद्धा मिळेल. तुम्हाला जर मोत्यांचा सेट बनवून हवा असेल तर तो सुद्धा इथे अगदी लगेच बनवून मिळेल. नवीन ट्रेंडिंगला आलेले चंद्राचे हार सुद्धा तुम्हाला इथे स्वस्त दरात मिळतील. त्यात सोबत इथे तुम्हाला चंद्राच्या हेअर पिन सुद्धा मिळतील.
advertisement
'आमच्या दुकानांमध्ये असे कोणतेही दागिन्यांचे प्रकार नाहीत जे मिळत नाहीत. तुम्हाला जो लुक करायचा आहे त्याचे सगळे दागिने आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि मार्केट भावापेक्षा आम्ही हे अगदी स्वस्त दरात विकतो,'असे दुकानदार कृष्णा यांनी सांगितले.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
December 24, 2024 5:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मनासारखे डायमंड आणि मोत्याचे दागिने, लग्नासाठी डोंबिवलीत करा खरेदी, किंमत फक्त 100 रुपयांपासून

