वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे आकर्षक दागिने, फक्त 99 रुपयांपासून करा खरेदी, नाशिकमधील हे ठिकाण माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
तुम्ही सोन्याला उत्तम पर्याय म्हणून काही बघत असाल तर नाशिकमध्ये तुम्ही वनग्रॅम गोल्ड ज्वेलरी दागिने खरेदी करू शकतात. तुम्हाला नाशिक शहरातील उत्तमनगर परिसरामध्ये हे वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे दागिने स्वस्तात खरेदी करता येणार आहेत.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : दागिने हा प्रत्येक महिलेचा आवडीचा विषय. दागिने परिधान करणे हे प्रत्येक महिलेला आवडत असतं. त्यातल्या त्यात जर सोन्याचे दागिने असतील तर अजूनच आवडतात. पण सध्याला सोन्याचे भाव वाढलेले आहेत आणि सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाकाच्या बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सोन्याला उत्तम पर्याय म्हणून काही बघत असाल तर नाशिकमध्ये तुम्ही वनग्रॅम गोल्ड ज्वेलरी दागिने खरेदी करू शकतात. तुम्हाला नाशिक शहरातील उत्तमनगर परिसरामध्ये हे वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे दागिने स्वस्तात खरेदी करता येणार आहेत.
advertisement
कुठे कराल खरेदी?
नाशिक शहरातील उत्तमनगर परिसरामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे दागिने मिळतील. या ठिकाणी तुम्हाला हुबेहूब जशा सोन्याच्या दागिन्यांच्या डिझाईन असतात तशाच डिझाईन वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीमध्ये मिळतील. राजलक्ष्मी ज्वेलर्स या ठिकाणी तुम्ही हे वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे दागिने खरेदी करू शकतात.
advertisement
कोणत्या प्रकारचे मिळतात दागिने?
वनग्रॅम गोल्ड मंगळसूत्र, मॅट फिनिशिंग मंगळसूत्र, कानातले, झुमके, बांगड्या, ब्रायडल ज्वेलरी सेट, पाटल्या, राणी हार, पोहे हार, टेम्पल ज्वेलरी, बुगड्या, शॉर्ट मंगळसूत्र, चोकर, लांब गळ्यातले, साखळी, ब्रासलेट, साउथ इंडियन ज्वेलरी, नाकातले, कोल्हापुरी साज, जेन्स्टसाठी वनग्रॅम अंगठी, हातातील ब्रेसलेट, चैन, गोफ असे विविध प्रकारचे दागिने याठिकाणी 1 वनग्रॅममध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तसेच चांदीच्या प्रतीचे देखील दागिने आणि भेटवस्तू यांच्याकडे उपलब्ध आहेत.
advertisement
काय आहेत दागिन्यांच्या किंमती?
वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे दागिने हे 99 रुपयांपासून मिळायला सुरू होतात. तर तुम्हाला 7-8 हजारांपर्यंत हे सर्व दागिने भेटून जातील. प्रत्येक दागिन्यांची किंमत ही वेगवेगळी त्यांच्या प्रकारानुसार असणार आहे.
जर तुम्हाला सुद्धा वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्ही नाशिक शहरातील उत्तमनगर येथे येऊन हे दागिने खरेदी करू शकता. तसेच याच्यावरती तुम्हाला विविध अशा ऑफर देखील उपलब्ध आहेत, असं येथील विक्रेते रवींद्र अहिरे यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
December 24, 2024 2:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
वनग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे आकर्षक दागिने, फक्त 99 रुपयांपासून करा खरेदी, नाशिकमधील हे ठिकाण माहितीये का?

