Guess Who : बॉलिवूड अभिनेत्रीची 'No Kissing Policy', हिरोचे ओठ ओठांना लागले म्हणून 100 वेळा धुतला चेहरा, दात घासले, उलटीही केली

Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीने कधीच कोणत्या चित्रपटात किसिंग सीन दिलेला नाही. एकदा एका अभिनेत्याचे ओठ अभिनेत्रीच्या ओठांना लागले. त्यानंतर अभिनेत्रीने थेट दात घासले होते. त्यानंतर तिला उल्टीदेखील झाली होती.
1/7
 ‘मस्त मस्त गर्ल’ म्हणून लोकप्रिय असलेली रवीना टंडन फक्त आपल्या अभिनयासाठीच नव्हे, तर आपल्या बेधडकपणासाठीही ओळखली जाते. 'पत्थर के फूल' या पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून तिला खरी ओळख मिळाली होती. पण तिने नेहमी स्वतःच्या तत्वांवर आणि अटींवरच काम केले. रवीनाने कधीही चित्रपटांत किसिंग सीन दिला नाही. एकदा असं झालं की एका हिरोचे ओठ तिच्या ओठांना लागले, तेव्हा अभिनेत्रीने लगेच दात घासले आणि तिला उलटीसुद्धा झाली होती.

advertisement
2/7
 रवीना टंडनचा जन्म 26 ऑक्टोबर 1974 मध्ये झाला. चित्रपटसृष्टीत पदार्पण करताच रवीना टंडनने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना वयाच्या 21 व्या वर्षी रवीनाने दोन मुलींना दत्तक घेत सर्वांना आश्चर्यचकित केलं. या निर्णयानंतर रवीना टंडनला अनेक प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागला. या मुलींना तिने लग्नाआधी लपवून ठेवलं होतं? त्या रवीनाच्याच मुली आहेत, असं म्हणत लोकांनी रवीनाला ट्रोल केलं.

3/7
 रवीना टंडनने आपल्या करिअरमध्ये कधीही ऑन-स्क्रीन किसिंग सीन दिलेले नाहीत. रवीनाने नेहमीच आपली ‘नो किसिंग पॉलिसी’ पाळली. तिचं मत असं होतं की किसिंग ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे आणि तिला पडद्यावर असे सीन करणं अजिबात सोयीचं वाटत नव्हतं. त्यामुळे ती जेव्हा एखादा चित्रपट साइन करत असे, तेव्हाच ती अट घालत असे की तिच्याकडून कधीही किसिंग सीन करवला जाणार नाही. मात्र एकदा 'अभय' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक घटना घडली. लहरें रेट्रोशी बोलताना रवीनाने सांगितलं, “मला आठवतं, एकदा मी माझ्या सहकलाकारासोबत थोडा बोल्ड सीन करत होते. त्याच दरम्यान चुकून त्याचे ओठ माझ्या ओठांना लागले. हे पूर्णपणे अनावधानाने झालं होतं. सीन संपताच मी थेट माझ्या खोलीत गेले आणि मला उलटी झाली, कारण मी फारच अस्वस्थ झाले होते. मी लगेच दात घासले आणि चेहरा शंभर वेळा धुतला.”

4/7
 रवीना टंडन आणि शाहरुख खान यांनी एकत्र ये लम्हे जुदाई के, जादू, जमाना दीवाना आणि पहला नशा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पण त्यानंतरही रवीनाने शाहरुखसोबत ऑफर झालेला आणखी एक चित्रपट नाकारला होता आणि त्यामागचं कारण होतं छोटे कपडे घालणे. रवीनाने सांगितलं,“मला शाहरुख खानच्या एका चित्रपटात शॉर्ट ड्रेस घालण्यास सांगितलं गेलं होतं. मी स्पष्टपणे नकार दिला. मी त्या चित्रपटाचं नाव घेणार नाही. माझ्या मते, सुंदर दिसण्यासाठी लहान कपडे घालणं आवश्यक नाही. मेकअप आणि ड्रेसिंग स्टाइल योग्य असेल, तर सौंदर्य आपोआप खुलून येतं.”

5/7
 1994 मध्ये आलेला 'मोहरा' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात रवीनासोबत अक्षय कुमार झळकला होता. या चित्रपटातील “टिप टिप बरसा पानी” हे गाणं ब्लॉकबस्टर ठरलं आणि या गाण्यामुळे रवीनाला एका रात्रीत डान्सिंग क्वीन म्हणून ओळख मिळाली. पण या गाण्याशी एक मनोरंजक किस्सा आहे. एका मुलाखतीत रवीनाने सांगितलं होतं की या गाण्याच्या शूटिंगदरम्यान रणवीर सिंग सेटवर उपस्थित होता आणि तिने त्याला सेटच्या बाहेर जाण्यास सांगितलं होतं. रवीनाने सांगितलं की त्या वेळी रणवीर अजून लहान आणि खूप खोडकर होता. “टिप टिप बरसा पानी” हे गाणं अत्यंत सेंशुअल होतं. माझं मत असं होतं की अशा दृश्यांकडे पाहण्याची एक ठराविक वयमर्यादा असते, आणि त्या वेळी रणवीर त्या वयाचा नव्हता. त्यामुळे मी प्रोड्यूसरला विनंती केली होती की सेटवर फक्त पालकांनाच राहू द्यावं आणि मुलांना बाहेर पाठवावं. त्यामुळे रणवीरला सेटच्या बाहेर पाठवण्यात आलं होतं".

6/7
 रवीना टंडन नेहमीच आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात आरे मेट्रो 3 कारशेडबाबत रवीनानेही विरोध केला होता. तिने ट्विटरवर पोस्ट करून आपला विरोध नोंदवला होता. तिच्या त्या पोस्टवर एका युजरने विचारलं की, “तुम्हाला माहित आहे का, मुंबईत मिडल क्लास लोकांना प्रवास करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो?”. यावर रवीनाने उत्तर दिलं,“टीनएजच्या काळात मी लोकल ट्रेन आणि बसने प्रवास केला आहे. छेडछाड सहन केली आहे, चिमटे काढले गेले आहेत. जे काही बहुतेक महिलांबरोबर घडतं, ते सगळं माझ्यासोबतही घडलं. साल 1992 मध्ये मी माझी पहिली कार घेतली. विकासाला कोणी थांबवत नाही, पण आपल्याला जबाबदारीही घ्यावी लागेल. फक्त एखाद्या प्रोजेक्टसाठीच नव्हे, तर जेव्हा-जेव्हा हिरवेगार जंगल तोडले जातील तेव्हा आपण याकडे लक्ष द्यायला हवं.”

7/7
 रवीना टंडन 90 च्या दशकात चांगलीच लोकप्रिय होती. पण एकदा तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने सांगितलं,“90च्या दशकातील गॉसिप मॅगझिन्स अतिशय निकृष्ट दर्जाच्या होत्या. माझ्याबद्दल खूप विचित्र गोष्टी लिहिल्या जात होत्या. कधी मला ‘थंडर थाइज’ म्हटलं जायचं, कधी ‘मिस हे’, ‘मिस ते’, तर कधी ‘90 किलोची’ असंही म्हणायचे. खरं सांगायचं तर त्या काळात मी जाडी होते. मी फक्त 16 वर्षांची असताना माझं करिअर सुरू केलं आणि खरंच, तेव्हा मी थोडी हेल्दी होते. मात्र आता मला त्याचं काहीच वाटत नाही. मला जसं आहे तसं राहणं आवडतं आणि मला वाटतं मी अशाच रूपात सर्वांत छान दिसते.”

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement