अमिताभचा तो सुपरफ्लॉप पिक्चर, ज्याच्या नावे 8 गाण्यांचा रेकॉर्ड, लता दीदी-आशा ताईंनी दिलाय आवाज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Flop Film Hit Songs : अमिताभ बच्चन यांचं सिनेसृष्टीतील करिअर अनेक चढ-उतारांनी भरलेलं आहे. अँग्री यंग मॅन म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या बिग बींनी पुढे अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांचे काही चित्रपट हिट ठरले, तर काही प्रेक्षकांना विशेष आवडले नाहीत. 1970 च्या दशकात त्यांनी अनेक संवेदनशील आणि आव्हानात्मक भूमिका केल्या. अमिताभ बच्चन यांच्या सुपरफ्लॉप चित्रपतालील गाण्यांनी मात्र चांगलाच रेकॉर्ड केला होता. आजही ही गाणी सुपरहिट आहेत.
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. पण यातील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष यशस्वी ठरले नाहीत. पण या चित्रपटांच्या कथा आणि संगीताने मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरमध्ये पारंपारिक हिरोच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळ्या भूमिकांना न्याय दिला. अमिताभ बच्चन यांचे हे चित्रपट त्यांच्या दर्जेदार अभिनयाची झलक दाखवतात. बिग बींचा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला असला तरी त्यातील गाण्यांनी मात्र प्रत्येक प्रेक्षकाचं मन जिंकून घेतलं होतं.
advertisement
1973 साली प्रदर्शित झालेल्या 'सौदागर' या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाची कथा मोती नावाच्या एका व्यक्तीभोवती फिरते. मोती हा व्यक्ती खजुराचा रस काढून त्यापासून गूळ तयार करतो. मोती पुढे फूल जान नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. त्याला तिच्यासोबत लग्न करायचं असतं, पण लग्नासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. त्यामुळे तो महजबीन नावाच्या विधवेशी लग्न करतो, जी त्याच्यासाठी गूळ बनवत असे. शेवटी तो तिला घटस्फोट देतो आणि फूल जानशी लग्न करतो. पण या चित्रपटाच्या कथानकात खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा मोतीला कळतं की फूल जॉनला गूळ बनवता येत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अमिताभ बच्चन किंवा नूतन यांचे चाहते असाल किंवा अजूनपर्यंत 'सौदगर' हा चित्रपट पाहिला नसेल, तर तुम्हाला प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहता येईल. या चित्रपटातील गाणी आजही यूट्यूबवर खूप लोकप्रिय आहेत. इतकेच नव्हे, तर पद्मा खन्ना यांच्या ‘सजना है मुझे सजना के लिए’ या गाण्याचे अनेक वेळा रीमेकही बनवले गेले आहेत. हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट आहे, ज्यात त्यांनी आपल्या अभिनयाचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांसमोर सादर केला.


