World's Costliest nail paint: अबब! इतकी महान नेलपेंट, इतक्या पैशांमध्ये येईल लक्झरी गाडी आणि बंगला, जाणून घ्या आहे तरी काय ‘या’ नेलपेंटमध्ये

Last Updated:

World's Costliest nail paint: जगातली सगळ्यात महाग नेलपेंट किंवा नेलपॉलिश की कोट्यवधी रूपयांची आहे असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे.

प्रतिकात्मक फोटो : अबब! इतकी महान नेलपेंट, इतक्या पैशांमध्ये येईल लक्झरी गाडी आणि बंगला
प्रतिकात्मक फोटो : अबब! इतकी महान नेलपेंट, इतक्या पैशांमध्ये येईल लक्झरी गाडी आणि बंगला
मुंबई : ‘शौक बडी चीज है’ असं म्हटलं जात. त्यामुळे अनेक व्यक्तींना वेगवेगळे छंद किंवा शौक असू शकतात. काहींना महागड्या गाड्या वापरण्याचा, महागडे कपडे आणि महागडी घडाळं घालण्याचा छंद असू शकतो. अनेक गर्भश्रीमंत महिलांना महागड्या पर्स वापरण्याचा छंद असतो. या महिलांच्या पर्संची किंमत ही लाखात आणि कोट्यवधींमध्ये असते. जर तुम्हाला असं सांगितलं की काही महिलांना महागडी नेलपेंट लावण्याचा छंद आहे. तर... तुम्ही अंदाज कराल की, नेलपेंट ही सर्वसामान्यपणे 10 -20 रूपयांना मिळते. महागडी नेलपेंट असून असून कितीची असेल तर जास्तित जास्त काही हजार. जर त्यात चमक येण्सासाठी सोन्या-चांदीचा चुरा वापरला असेल तर त्यांची किंमत कदाचित लाख रूपयांपर्यंत असू शकते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की जगातली सगळ्यात महाग नेलपेंट किंवा नेलपॉलिश की कोट्यवधी रूपयांची आहे तर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे.

जाणून घेऊयात या कोट्यवधींच्या नेलपेंटबद्दल

नेलपेंट इतकी महाग का ?

ही नेलपॉलिश खूप महाग आहे कारण ती एका लक्झरी ज्वेलरी डिझायनरने तयार केली असून त्यात दुर्मिळ हिऱ्यांचा वापर करण्यात आलाय. याशिवाय जगातल्या इतर महागड्या नेलपॉलिशही त्यात असलेली प्लॅटिनम पावडर आणि खास आकाराच्या बाटल्यांमुळे प्रसिद्ध आहेत.

फॅशन डिझायनर कोण ?

ब्लॅक डायमंड किंग म्हणून ज्यांची ओळख आहे असे लॉस एंजेलिसचे डिझायनर ॲझेचर पोगोस्यान यांनी ही महागडी नेलपेंट तयार केलीये. त्यांनी या नेल पॉलिशचे नाव पण ‘ॲझेचर’ असंच ठेवलंय.
advertisement

नेलपेंटमध्ये हिरे

होय तुम्ही वाचलं ते खरं आहे. हिराची गणना ही जगातल्या अनेक महाग वस्तूंमध्ये होते. हिऱ्याचं कॅरेट जितकं जास्त तितकी त्याची किंमत जास्त. हा नियम जर हिऱ्याला लागू असेल तर ब्लॅक डायमंडच्या बाबतीत तर बोलायलाच नको. आधी सांगितल्याप्रमाणे ॲझेचर पोगोस्यान यांची ओळख ही ब्लॅक डायमंड किंग आहे. त्यामुळे नेलपेट लावल्यानंतर तिला चकाकी येण्यासाठी पोगोस्यान यांनी त्यात ब्लॅक डायमंड म्हणजेच काळ्या हिऱ्यांचा वापर केलाय.
advertisement

किंमत

या महागड्या एका नेलपेंटमध्ये 267 काळे हिरे आहेत.ज्यांची किंमत सुमारे अडीच लाख अमेरिकन डॉलर्स ($2,50,000) म्हणजेच जवळपास 1 कोटी 90 लाख रूपये आहे.

वापर कोणाकडून ?

वर सांगितल्या प्रमाणे गर्भश्रीमंत व्यक्तींना अनेक प्रकारचे छंद किंवा आवड असते. हिरा हा 99 टक्के महिलांचा आवडता दागिना, अशातच सौंदर्य वाढवण्याच्या एका महागड्या नेलपेंटमध्ये हिरा असणं कोणाला नाही आवडणार. त्यामुळे ही नेलपॉलिश महागडी जरी असली तरीही अनेक मॉडेल, व्यावसायिक, अभिनेत्री आणि गर्भश्रीमंत महिलांनी या नेलपेंटला पसंती दिल्याचं  कळतंय.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
World's Costliest nail paint: अबब! इतकी महान नेलपेंट, इतक्या पैशांमध्ये येईल लक्झरी गाडी आणि बंगला, जाणून घ्या आहे तरी काय ‘या’ नेलपेंटमध्ये
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement