तुम्ही पण गरम-गरम चहा पिता का? मग हा धोक्याचा इशारा, संशोधनातून समोर आलं गरम पेयामागचं सत्य
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सकाळची झोप उडवायची असेल, थकवा घालवायचा असेल तर चहा हा भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे.
मुंबई : भारतातील बहुतेक लोकांची सकाळ चहाशिवाय सुरूच होत नाही. सकाळची झोप उडवायची असेल, थकवा घालवायचा असेल तर चहा हा भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. कुणाला एकदम उकळती गरम चहा प्यायला आवडताते, तर काहींना थोडा थंड झालेला चहा पिण्यात आनंद मिळतो. लोक आपल्या आपल्या आवडीप्रमाने चहा पितात.
पण अती गरम चहा पिणं हे आरोग्यासाठी खूपच हानिकार आहे. तुम्हाला पण अशी सवय असेल तर आधी तुम्हाला याचे धोके जाणून घेणं गरजेचं आहे. काही संशोधनांनी तर असेही सांगितले आहे की अतिशय गरम चहा नियमितपणे पिल्यास घशाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
अनेक वैज्ञानिक अभ्यासांनुसार, 65 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाचा चहा पिणं अन्ननलिकेच्या (esophagus) पेशींना नुकसान पोहोचवतो. अतिगरम पेय वारंवार पिल्याने नलिकेतील कोमल पडदा जळतो आणि तिथे सूज येते. ही सूज दीर्घकाळ टिकल्यास पेशींमध्ये बदल होऊ लागतात, ज्याला सेल म्युटेशन किंवा क्रॉनिक इंफ्लेमेशन म्हणतात. हेच पुढे जाऊन कर्करोगाचे रूप घेऊ शकतात.
advertisement
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुद्धा या निष्कर्षाला मान्यता दिली आहे. त्यांच्या मते, नियमितपणे 65 डिग्री सेल्सियसपेक्षा गरम पेय घेतल्याने एसोफॅजियल कॅन्सरचा धोका वाढतो.
कोणता कर्करोग आणि त्याचे प्रकार
अन्ननलिकेच्या कर्करोगाचे दोन मुख्य प्रकार असतात
1) एसोफॅजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा हा नलिकेच्या वरच्या भागात होतो. गरम पेय, तंबाखू किंवा धूम्रपान हे याची मुख्य कारणं मानली जातात.
advertisement
2) एसोफॅजियल अॅडेनोकार्सिनोमा हा नलिकेच्या खालच्या भागात होतो आणि प्रामुख्याने मोटापा आणि दीर्घकाळ चालणारी अॅसिडिटी यामुळे निर्माण होतो.
चहा नाही, त्याचं तापमान दोषी
तज्ज्ञ सांगतात की, चहा स्वतःहून हानिकारक नाही, पण तो अतिशय गरम असल्यामुळे समस्या उद्भवतात. चहा, कॉफी किंवा सूप हे सर्व पेय जर खूप गरम असताना गिळले, तर ते नलिकेचं नुकसान करतात. आयुर्वेदात सुद्धा सांगितलं आहे की, अन्न किंवा पेय ना खूप गरम, ना खूप थंड असावं. गरम पेय पचनासाठी मदत करतात, पण तापमान जास्त असल्यास ते पित्त वाढवतात, ज्यामुळे शरीरात सूज आणि इतर रोग उद्भवू शकतात.
advertisement
लक्षणे दुर्लक्षित करू नका
जर एखाद्या व्यक्तीला सतत गिळताना त्रास होत असेल, घसा दुखत असेल, खवखवत असेल, आणि त्यासोबत वजन झपाट्याने कमी होत असेल, तर ही लक्षणे गंभीर असू शकतात. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गरम चहा आणि कर्करोग यांचं नातं काय खरं आहे?
view comments‘हेल्थलाइन’च्या अहवालानुसार, फक्त गरम चहा पिणं कर्करोगाचं थेट कारण नाही. पण जर एखादा व्यक्ती अतिगरम चहा, धूम्रपान आणि मद्यसेवन हे सर्व एकत्र करतो, तर त्याचा धोका निश्चितच वाढतो. अधूनमधून थोडा गरम चहा घेतल्याने काही धोका नसतो. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, पण सवयीनं अतिगरम चहा पिणं टाळावं. सध्या या विषयावर अजूनही संशोधन सुरू आहे, त्यामुळे निश्चित निष्कर्षासाठी अधिक माहितीची आवश्यकता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 4:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुम्ही पण गरम-गरम चहा पिता का? मग हा धोक्याचा इशारा, संशोधनातून समोर आलं गरम पेयामागचं सत्य