Benefits of Milk: आरोग्यासाठी फायद्याचं आहे दूध, मात्र दूध पिण्याची योग्य वेळ माहिती आहे का?

Last Updated:

Best time to drink Milk: दुधात असलेल्या विविध पौष्टिक घटकांमुळे दूध पिण्याने आरोग्याला फायदे होतात. मात्र दूध हे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने प्यायल्यास त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात.

News18
News18
मुंबई : दूध हा आपल्या शरीराचा वाढीसाठी एक महत्त्वाचा अन्न घटक आहे. दुधात कॅल्शियम, प्रोटीन्स, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12 आणि पोटॅशियम यासारखी विविध पोषकतत्वं असतात जी आपल्या शरीरासाठी फायद्याची ठरतात. सांधेदुखी, हाडांच्या त्रास असणाऱ्यांना अनेकदा दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र चांगलं दूध कोणतं गायीचं की म्हशीचं ? असा प्रश्न आपल्या मनात नक्कीच येऊ शकतो. याशिवाय दूध पिण्याची योग्य वेळ कोणती ? सकाळ, दुपार की संध्याकाळ कोणत्या वेळी दूध प्यायल्याने शरीराला जास्त फायदे होतील,  जाणून घेऊयात या लेखातून.
आहाराबद्दल काय सांगतं आयुर्वेद?
आयुर्वेदानुसार, जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ राहायचं असेल तर फक्त सकस आणि पौष्टिक आहारच महत्त्वाचा नाहीये तर योग्य वेळी योग्य पदार्थ खाणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दुधात असलेल्या विविध पौष्टिक घटकांमुळे दूध पिण्याने आरोग्याला  फायदे होतात. मात्र दूध हे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने प्यायल्यास त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात.
advertisement
Best time to drink Milk : आरोग्यासाठी फायद्याचं आहे दूध, मात्र दूध पिण्याची योग्य वेळ माहिती आहे का?
दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ ?
आयुर्वेदानुसार, सकाळी दूध पिणं हे लहान मुलांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. तरूण, मध्यमवयीन किंवा वृद्ध व्यक्ती सकाळी नाश्ता करताना दूध पिऊ शकतात. मात्र वृद्ध व्यक्तींना दूधाचे पूर्ण फायदे हवे असतील तर त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणं हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त फायद्याचं आहे. रात्री दूध पिऊन नंतर झोपल्याने पचनसंस्था चांगलं कार्य करते. याशिवाय, झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने झोपेची गुणवत्ता देखील सुधारू शकते. त्यामुळे निद्रानिशाचा आजार असलेल्यांनी रात्री दूध पिऊन झोपण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. रात्री कोमट किंवा गरम दूध प्यावं, तर दिवसा दूध थंड किंवा गरम दूध तुमच्या आवडीनुसार तुम्ही सेवन करू शकता.
advertisement
एका दिवसात किती दूध प्यावं?
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त दूध प्यायला सुरूवात केली किंवा एकाच दिवशी जास्त दूध प्यायल्यात आणि नंतर दूध पिणं टाळलं तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे दिवसातून 2 ते 3 कप दूध पिणं फायद्याचं ठरू शकतं. जर तुम्ही फुल-क्रीम दूध पीत असाल तर 2 कपापेक्षा जास्त दूध पिणं टाळावं. यामुळे वजन वाढण्याचा  त्रास होऊ शकतो.
advertisement
दुधामुळे शरीराला होतात अनेक फायदे
दुधात आढळणाऱ्या सगळ्या पोषक तत्त्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. याशिवाय दुधात असलेल्या कॅल्शियममुळे हाडांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे अनेकदा आजारपणात दूध पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. सर्दी, खोकल्या सारख्या आजारांवर हळद टाकलेलं दूध पिणं हे कोणत्या औषधापेक्षा कमी नाहीये.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of Milk: आरोग्यासाठी फायद्याचं आहे दूध, मात्र दूध पिण्याची योग्य वेळ माहिती आहे का?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement