Heart Attack : तुमच्या पाण्याच्या बाटलीमुळेही तुम्हाला येऊ शकतो हार्ट अटॅक, पण कसा?

Last Updated:

Heart Attack Reason : हार्ट अटॅकची तशी बरीच कारणं आहेत. पण पाण्याच्या बाटलीने हार्ट अटॅक येऊ शकतो, याबाबत तुम्ही कधी विचार तरी केला होता का?

News18
News18
नवी दिल्ली : हार्ट अटॅक का आणि केव्हा येतो? तर जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो आणि हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. तेव्हा हृदयाचं कार्य थांबतं आणि हृदयविकाराचा झटका येतो. आता रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येण्याची अनेक कारणं आहेत आणि त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणजे हार्ट अटॅकची तशी बरीच कारणं आहेत. पण पाण्याच्या बाटलीने हार्ट अटॅक येऊ शकतो, याबाबत तुम्ही कधी विचार तरी केला होता का?
आपण कुठेही बाहेर जाताना सोबत पाण्याची बाटली नेतो. किंबहुना आता घरातही बरेच लोक बाटलीतूनच पाणी पितात. तुम्हीही बाटलीतून पाणी पित असाल तर सावधान! कारण यामुळे हार्ट अटॅकचा धोका आहे. आता सगळ्याच बाटलीतून पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका आहे का? तर तसं नाही. फक्त प्लॅस्टिकच्या बाटलीमुळे ही समस्या उद्भवू शकते. पण तरी प्रश्न आहेच की ते कसं?
advertisement
आता प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर खूप सामान्य झाला आहे. घरी असो, ऑफिसमध्ये असो किंवा प्रवासात असो, बहुतेक लोकांना प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिणं सोपं आणि सोयीस्कर वाटतं पण अलिकडच्या संशोधनात असं आढळून आलं आहे की प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिणं हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
advertisement
प्लॅस्टिकमध्ये असलेले काही धोकादायक केमिकल शरीरात प्रवेश करू शकतात आणि हृदयविकाराचा झटका आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढवू शकतात.  प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीए आणि फॅथलेट्स असतात, जे शरीराच्या नैसर्गिक संप्रेरकांवर परिणाम करतात, ज्यामुळे असामान्य रक्तदाब होऊ शकतो, जो हृदयविकाराचा एक प्रमुख कारण आहे. याशिवाय हे केमिकल्स शरीरात जळजळ वाढवू शकतात आणि धमन्या आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा येतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
advertisement
काही अभ्यासात असं आढळून आलं आहे की बीपीएच्या संपर्कात आल्याने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि गूड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. इतकंच नाही तर प्लॅस्टिकमध्ये असलेले रसायने शरीरात मुक्त रॅडिकल्सचं प्रमाण वाढवतात, ज्यामुळे पेशींचं नुकसान होतं आणि हृदयावर वाईट परिणाम होतो.
advertisement
टाइम्स ऑफ इंडियामध्ये या विविध रिसर्चबाबत माहिती देण्यात आली आहे. जर तुम्ही प्लॅस्टिकची बाटली वापरत असाल तर बीपीए फ्री बाटल्या खरेदी करा आणि त्यांचे लेबल तपासा. पुनर्वापर केलेल्या प्लॅस्टिक बाटल्या कालांतराने अधिक धोकादायक बनू शकतात. म्हणून त्यांचा पुनर्वापर टाळा. प्लॅस्टिकच्या बाटलीत गरम पाणी भरल्याने किंवा बाटली उन्हात ठेवल्याने रासायनिक लीचिंग वाढते, हे टाळलं पाहिजे.  शक्यतो पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी काचेच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या वापरा. घराबाहेर पडण्यापूर्वी, स्टील किंवा काचेची पाण्याची बाटली सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला बाहेर प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यावे लागणार नाही.
advertisement
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : तुमच्या पाण्याच्या बाटलीमुळेही तुम्हाला येऊ शकतो हार्ट अटॅक, पण कसा?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement