Heart Attack : चेहऱ्यावरूनच समजतं हार्ट अटॅक येणार आहे, दिसतात अशी लक्षणं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Heart Attack Symptoms : हार्ट अटॅकचा धोका आहे हे चेहऱ्यावरूनच ओळखता येईल. आता ते कसं?, चेहऱ्यावर हार्ट अटॅकची लक्षणं कशी दिसतात? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील.
नवी दिल्ली : हार्ट अटॅक म्हटलं की सगळ्यात आधी आपल्यासमोर येतं ते छातीतील वेदना, हेच प्रामुख्याने हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण. याशिवाय आणखी काही लक्षणं आहेत. पण काही लक्षणं अशी आहेत ज्याचा आपण विचारही करणार नाहीत ही ती हार्ट अटॅकची असू शकतात. अशीच काही लक्षणं चेहऱ्यावरही दिसतात.
हार्ट अटॅक येण्याआधी आपल्या चेहऱ्यावर काही लक्षणं दिसतात. यामुळे आपल्या हार्ट अटॅक येणार आहे, हार्ट अटॅकचा धोका आहे हे चेहऱ्यावरूनच ओळखता येईल. आता ते कसं?, चेहऱ्यावर हार्ट अटॅकची लक्षणं कशी दिसतात? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. चला तर मग हार्ट अटॅकची चेहऱ्यावर कोणती लक्षणं दिसतात ते पाहुयात.
advertisement
दातदुखीची समस्या
हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण दातदुखी हृदयविकाराच्या झटक्याने होऊ शकते. जरी दातदुखी काही समस्येमुळे होऊ शकते, पण जर ही वेदना कायम राहिली तर उशीर न करता डॉक्टरकडे जा. हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं.
हिरड्यांमधून रक्त
अनेकांना हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या असते. कधीकधी ती सामान्य असू शकते, पण कधीकधी ती हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षणदेखील असू शकतं. जर तुम्हाला हिरड्यांमधून सतत रक्त येण्याची समस्या येत असेल तर ताबडतोब त्याकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
तोंडात अल्सर
पोटाच्या समस्यांमुळे तोंडात अल्सर होतात असं म्हटलं जातं, पण कधीकधी हे अल्सर हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असू शकतात. डॉक्टरांच्या मते, तोंडात अल्सरची समस्या हृदयविकाराच्या आधी उद्भवू शकते.
जबड्यात वेदना
बऱ्याचदा आपल्याला जबड्यात वेदना होऊ लागतात, ते सामान्य मानण्याची चूक आपण करतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का की हृदयविकाराच्या आधीही तुम्हाला जबड्यात वेदना होण्याची तक्रार येऊ शकते. जर तुम्हाला जबड्यात वेदना होत असतील तर वेळेवर डॉक्टरकडे जा.
advertisement
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Location :
Delhi
First Published :
July 19, 2025 1:14 PM IST