Heart Attack : काय! साखरेमुळेही हार्ट अटॅक येतो? गोड खाल्ल्याने हृदयावर काय होतो परिणाम

Last Updated:

Sugar Cause Heart Attack Reason : मीठ खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका आहे, हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? मीठच नाही तर साखर खाल्ल्यानेही हार्ट अटॅक येऊ शकतो. वाचून आश्चर्य वाटलं असेल. पण ते कसं ते पाहुयात.

News18
News18
नवी दिल्ली : हार्टची समस्या असेलल्यांना जास्त मीठ न खाण्याचा सल्ला दिला जातो. जास्त मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशरवर परिणाम होतो आणि परिणामी हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. त्यामुळे मीठ खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका आहे, हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? मीठच नाही तर साखर खाल्ल्यानेही हार्ट अटॅक येऊ शकतो. वाचून आश्चर्य वाटलं असेल. पण ते कसं ते पाहुयात.
साखर म्हटलं की सगळ्यात आधी कोणता आजार समोर येतो तर साहजिकच डायबेटिज. साखर मधुमेहाशी जोडली जाते. पण साखर आणि हार्ट अटॅकचा संबंध क्वचितच कुणाला माहिती असेल. साखर खाल्ल्यानेही हार्टवर परिणाम होऊ शकतो.
जास्त साखरेचं सेवन केल्याने शरीरात दीर्घकाळ जळजळ होण्याची समस्या वाढू शकते. हे खराब झालेल्या धमन्यांचे मूळ कारण मानलं जाऊ शकते. साखरेचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे स्वादुपिंडाला जास्त इन्सुलिन सोडावं लागतं. अशा परिस्थितीत कालांतराने हळूहळू चयापचय संतुलन बिघडू लागतं. यामुळे हे इन्सुलिन प्रतिरोधकता येऊ शकते. ही स्थिती मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
advertisement
ओन्ली माय हेल्थवर दिलेल्या माहितीनुसार याव्यतिरिक्त जास्त साखर आतड्यात चरबीचं उत्पादन वाढवतं, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि धमन्यांचा कडकपणा वाढतो. यामुळे एथेरोस्क्लेरोसिसचा मार्ग मोकळा होतो, ज्यामध्ये प्लाक जमा झाल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
advertisement
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठीने याची पडताळणी केलेली नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : काय! साखरेमुळेही हार्ट अटॅक येतो? गोड खाल्ल्याने हृदयावर काय होतो परिणाम
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement