advertisement

Echinacea Health Benefits अनेक आजारांवर गुणकारी आहे ‘ही’ वनस्पती, अमेरिकन लोकांची आहे जीव की प्राण

Last Updated:

Echinacea Health Benefits: इचिनेशिया ही अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय औषधी वनस्पती आहे. या सुंदर दिसणाऱ्या वनस्पतीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. मधुमेह, हृदयरोग आणि इतर अनेक आजारांवर इचिनेशिया फायदेशीर आहे. जाणून घेऊयात इचिनेशियाचे फायदे.

प्रतिकात्मक फोटो : इचिनेशियाचं झाड
प्रतिकात्मक फोटो : इचिनेशियाचं झाड
मुंबई : इचिनेशिया ही अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय औषधी वनस्पती आहे. इचिनेशियाचं मूळ हे अमेरिकेतीलचं आहे. इचिनेशिया ही लिली कुटुंबातील एक अद्भुत वनस्पती आहे. ती जितकी सुंदर दिसते तितकीच ती आरोग्यासाठीही फायद्याची आहे. या वनस्पतींमध्ये अँटीऑक्सिडंट्सने भरपूर आढळून येतात. ज्यामुळे शरीराचं फ्री रॅडिकल्समुळे होणारं नुकसान टाळलं जातं, यामुळे विविध रोगांचा धोका कमी होतो. इचिनेशियाची पानंसुद्धा औषध म्हणून वापरली जातात. या पानांमुळे शरीरातील वेगाने ऊर्जा मिळते. मधुमेह, हृदयरोग आणि इतर अनेक आजारांवर इचिनेशिया फायदेशीर आहे. आता तर बाजारात इचिनेशियाची पावडर देखील उपलब्ध आहे.

जाणून घेऊयात इचिनेशियाचे आरोग्यदायी फायदे

मन:स्थिती सुधारण्यासाठी

कोणत्या कारणामुळे तुम्ही नाराज किंवा उदास असाल आणि यावेळी जर तुम्ही इचिनेशियाच्या पानांचा किंवा पावडरचा चहा घेतला तर तुमचा मूड चांगला होऊ शकतो. इचिनेशियामध्ये अल्कामाइड्स, रोस्मेरिनिक एसिड आणि कॅफिक एसिड असतात, ज्यामुळे चिंता किंवा उदास वाटण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे तुम्ही तणावात असाल किंवा एखाद्या गोष्टीची चिंता तुम्हाला सतावत असेल तर इचिनेशियाचा चहाचा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
advertisement

वेदनाशमक

इचिनेशियामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे शरीरातील जळजळ किंवा दुखणं कमी करतात. याशिवाय जर तुम्हाला मुका मार लागला असेल किंवा सूज आली असेल तर त्यावरही इचिनेशिया गुणकारी ठरू शकतं. हिवाळ्यात होण्याऱ्या सांधेदुखीच्या त्रासावर इचिनेशिया फायदेशीर आहे.
advertisement

डायबिटीस

डायबिटीस असलेल्या रुग्णांसाठीही इचिनेशिया खूप फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार, असं आढळून आलंय की इचिनेशियाच्या सेवनामुळे इन्सुलिनच्या स्त्रावाचं प्रमाण वाढलं. ज्याचा फायदा टाइप 2 डायबिटीस असलेल्या रुग्णांच्या झाला. त्याची रक्तातली वाढलेली साखर नियंत्रणात आली.

रोगप्रतिकारक शक्ती

इचिनेशियात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायाला मदत होते. इचिनेशियाच्या पानांमध्ये असलेल्या फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी मुळे अनेक ससंर्गजन्य आजारांपासून शरीराचा बचाव होतो. एका अभ्यासानुसार, इचिनेशिया ही श्वसन रोगांवर देखील गुणकारी ठरल्याचं दिसून आलंय.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Echinacea Health Benefits अनेक आजारांवर गुणकारी आहे ‘ही’ वनस्पती, अमेरिकन लोकांची आहे जीव की प्राण
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement