शाळा-कॉलेजमधील मित्र-मैत्रीणीमुळे तुटताय 50 टक्के संसार, कारण विचार करायला भाग पाडेल

Last Updated:

Social media impact on marriage : सध्या नवरा-बायकोमधील वादाच्या तब्बल 50 ते 60 टक्के प्रकरणांचे मूळ हे सोशल मीडियाच्या अतिवापरात दडलेले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या खुलाशानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : सोशल मीडियाने जग जवळ आणलं असलं, तरी घरातील माणसांमधील अंतर मात्र वाढवलं आहे. एकेकाळी सुखाचा संसार आणि विश्वासाचं नातं असलेल्या जोडप्यांमध्ये आता तिसरी व्यक्ती शिरली आहे, ती म्हणजे स्मार्टफोन. सध्या नवरा-बायकोमधील वादाच्या तब्बल 50 ते 60 टक्के प्रकरणांचे मूळ हे सोशल मीडियाच्या अतिवापरात दडलेले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या खुलाशानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
संसाराला सोशल मीडियाची वाळवी; घटस्फोटाची 60% कारणं चॅटिंगमध्ये?
आजकाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल असतो. पण हाच मोबाईल आता घराघरात कलहाचे कारण देखील बनत चालले आहे. कौटुंबिक न्यायालयातील तज्ज्ञ आणि समुपदेशकांच्या मते, सुखाच्या संसारासाठी सोशल मीडियाचा वारेमाप वापर अत्यंत मारक ठरत आहे.
व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम आणि विविध डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून स्त्री-पुरुष आपल्या शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींच्या किंवा जुन्या ओळखीच्या लोकांच्या संपर्कात असतात. सुरुवातीला 'हॅलो-हाय' ने सुरू झालेला हा संवाद कधी 'अमर्याद चॅटिंग'मध्ये बदलतो, हे समजत नाही. अशावेळी नकळतपणे कधीकधी चॅटमधील व्यक्तीकडे लोक ओढले जातात किंवा ऍट्रॅक्शन वाढतं, त्यात रात्री उशिरापर्यंत चालणारे हे चॅटिंग मनात वेगवेगळी विचार आणतात, त्यामुळे घरी बायको किंवा नवरा असला तरी देखील लोक या चॅटिंगमध्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात आणि त्यामुळे एक्ट्रामॅरेटल अफेअर्सची सुरुवात होते. कधीकधी असं काही नसलं तरी देखील सतत एखाद्याशी सोशल मीडियावर बोलताना नवऱ्याला किंवा बायकोला जोडीदार पाहातो, तेव्हा त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते आणि त्यामुळे नातं मोडकळीस येतं.
advertisement
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमधील वादाच्या प्रकरणांचा अभ्यास केला असता असे दिसून आले की गोपनीयता (Privacy) म्हणजे फोनला पासवर्ड असणे, जोडीदारासमोर फोन लपवणे किंवा नोटिफिकेशन आल्यावर दचकणे यामुळे संशयाची ठिणगी पडते.
एकमेकांशी बोलण्यापेक्षा मोबाईलवर वेळ घालवल्यामुळे संवादाची जागा सायलेंट किलर घेतो, सोशल मीडियावरील इतरांच्या 'परफेक्ट' फोटोंशी स्वतःच्या संसाराची तुलना केल्याने असंतोष वाढतोय.
advertisement
सोशल मीडियावरील जुने मित्र-मैत्रिणी अनेकदा भावनिक आधार वाटू लागतात. घरातील साध्या वादात जेव्हा जोडीदार समजून घेत नाही, तेव्हा व्यक्ती बाहेर संवाद शोधते. यातूनच विश्वासार्हता संपते आणि वादाचे रूपांतर थेट घटस्फोटाच्या अर्जात होते. "विभक्त होण्याचा विचार करणाऱ्या 10 पैकी 6 प्रकरणांच्या मुळाशी सोशल मीडियाचा संशय असतो," असे अधिकारी सांगतात.
संसार टिकवण्यासाठी 'डिजिटल डिटॉक्स' आवश्यक
१. जेवताना फोन बाजूला ठेवा: जेवताना किंवा बेडवर असताना मोबाईल पूर्णपणे टाळा आणि एकमेकांशी बोला.
advertisement
२. पारदर्शकता ठेवा: एकमेकांच्या सोशल मीडिया वापराबाबत पारदर्शकता असल्यास संशय निर्माण होत नाही.
३. व्हर्च्युअल जगातून बाहेर पडा: स्क्रीनवरील फोटोंपेक्षा प्रत्यक्ष आयुष्यात एकत्र फिरायला जा किंवा वेळ घालवा.
४. मर्यादा आखून घ्या: जुन्या मित्र-मैत्रिणींशी बोलताना आपल्या संसाराच्या मर्यादा ओलांडू नका.
५. सवांद साधा: काही खटकल्यास मोबाईलवर स्टेटस ठेवण्यापेक्षा थेट जोडीदाराशी चर्चा करा.
advertisement
तंत्रज्ञान वाईट नसते, पण त्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवायला हवे. फेसबुकवर 'हॅपी कपल'चे फोटो टाकण्यापेक्षा, ऑफलाईन आयुष्यात खऱ्या अर्थाने सुखी राहणे अधिक महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
शाळा-कॉलेजमधील मित्र-मैत्रीणीमुळे तुटताय 50 टक्के संसार, कारण विचार करायला भाग पाडेल
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement