तुमच्या मानेच्या उंचीवरुन समजतं व्यक्तीमत्त्व, कसं ते जाणून घ्या

Last Updated:

मानेच्या उंचीवरून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची झलक दर्शविणारी नेक लेन्ग्थ पर्सनॅलिटी टेस्ट नेमकी काय आहे, ते जाणून घेऊ या.

पर्सनालिटी टेस्ट
पर्सनालिटी टेस्ट
मुंबई, 13 ऑगस्ट : माणसाच्या शरीरातल्या प्रत्येक गोष्टीला स्वतःचं असं विशेष महत्त्व आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की एखाद्या व्यक्तीच्या मानेच्या उंचीवरूनदेखील त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व नेमकं कसं असेल, याचा अंदाज बांधता येतो. एखाद्या व्यक्तीच्या मानेची उंची आणि वक्रता विशिष्ट गुणधर्म आणि वैशिष्ट्यांशी संबंधित असू शकते. ‘जागरण जोश डॉट कॉम’ने याबाबत माहिती देणारं वृत्त दिलंय.
मानेच्या उंचीवरून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची झलक दर्शविणारी नेक लेन्ग्थ पर्सनॅलिटी टेस्ट नेमकी काय आहे, ते जाणून घेऊ या.
मानेची लांबी व्यक्तिमत्त्वाबद्दल काय सांगते?
सर्वांत प्रथम सोप्या पद्धतीचा वापर करून मानेच्या उंचीचा अंदाज लावण्यासाठी हातांच्या रुंदीचा वापर करा. तुमच्या कॉलरबोनच्या तळाशी येईपर्यंत हाताची बोटं (अंगठा वगळून) मानेवर आडवी ठेवा. तुमचे एकापेक्षा जास्त हात बसू शकत असतील, तर हे सूचित होतं, की तुमची मान सरासरीपेक्षा उंच आहे. तुम्ही तुमच्या गळ्यावर एक किंवा त्यापेक्षा कमी हात बसवू शकत असाल तर तुमच्या मानेची उंची लहान आहे. अर्थात हा एक ढोबळ अंदाज असून, अचूक मोजमाप नाही.
advertisement
लहान मान असणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं
तुमचा हात हनुवटीच्या खाली आडवा ठेवता तेव्हा 4 बोटांसाठीदेखील पुरेशी जागा नसल्यास, तुमची मान लहान असते. तुमची मान लहान असेल, तर तुमचं व्यक्तिमत्त्व मेहनती व चिकाटीचं असतं. तुम्ही तुमच्या व्यावहारिक आणि डाउन-टू-अर्थ स्वभावासाठी प्रसिद्ध आहात. तुमच्याकडे समस्यांवर समंजस उपाय शोधण्याची हातोटी आहे. तुम्ही लवचिक आहात. अडथळ्यांवर मात करून आपलं ध्येय साध्य करण्याचा तुमचा निश्चय आहे. लहान मान बहुतेकदा स्थिरता आणि स्वत:च्या मजबूत भावनेशी संबंधित असते. अशा व्यक्ती त्यांची कृती आणि निर्णयांबाबत स्थिर असतात.
advertisement
लहान मान असलेल्यांमध्ये इतरांप्रति कर्तव्य आणि जबाबदारीची तीव्र भावना असते. अशा व्यक्ती विश्वासार्ह असतात आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असतात. अनेकदा अशा गोष्टींकडे लक्ष देतात, ज्याकडे इतर दुर्लक्ष करू शकतात. लहान मान असणाऱ्या व्यक्तींकडे जीवनाकडे पाहण्याचा एक व्यावहारिक दृष्टिकोन असतो. अनावश्यक गुंतागुंतीपेक्षा या व्यक्ती व्यावहारिकतेला प्राधान्य देतात. लहान मानेच्या व्यक्ती वास्तववादी आणि समतल असतात. त्या सहजासहजी कल्पनेत वाहून जात नाहीत व वास्तवात राहण्यास प्राधान्य देता. त्यांच्यामध्ये उल्लेखनीय संयम असतो, जो त्यांना योग्य संधींची वाट पाहण्यास आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यास सक्षम करतो.
advertisement
लहान मान असलेल्या व्यक्ती त्यांच्या कृती आणि वर्तनात सुसंगत असतात. त्या विश्वासार्ह असतात. विविध परिस्थितींमध्ये त्यांच्यावर अवलंबून राहता येतं. त्यांचा व्यावहारिक स्वभाव असूनही, त्यांच्यासोबत जुळवून घेणं सहज शक्य होतं. त्यामुळेच अशा व्यक्ती सहजतेने नवीन परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. पाय जमिनीवर असणं, चिकाटी, व्यावहारिक, डाउन-टू-अर्थ, दृढनिश्चय, जबाबदारीची तीव्र भावना, वास्तववादी, सहनशील, जुळवून घेणारी, वास्तवात रुजलेली, अशी लहान मानेच्या व्यक्तींची वैशिष्ट्यं सांगता येतील. सॉफ्टवेअर इंजिनीअर, डेटा सायंटिस्ट, वेब डेव्हलपर, ग्राफिक डिझायनर, अकाउंटंट, लेखक, संपादक आदी क्षेत्रांतलं करिअर या व्यक्तींसाठी चांगलं मानलं जातं.
advertisement
Neck Shape Personality Test
उंच मान असणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं
तुम्ही तुमचा हात हनुवटीच्या खाली आडवा ठेवता तेव्हा 4 बोटांपेक्षा जास्त जागा असल्यास, तुमची मान उंच असते. जर तुमची मान उंच असेल, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांवरून तुम्ही सुंदर आणि हुशार आहात. तुमच्या मनमोहक हालचाली आणि शांत मुद्रा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींवर कायमची छाप उमटवतात. उंच मानेचा संबंध अनेकदा तीव्र बुद्धी आणि ज्ञानाच्या अतृप्त तहानेशी असतो. तुमच्याकडे नैसर्गिक कुतूहल असतं, जे तुम्हाला जगाचं अन्वेषण करण्यास प्रवृत्त करतं. तुमच्याकडे जीवनाची सखोल समज असते. तुमच्याकडे विचारपूर्वक सल्ला देण्याची अद्वितीय क्षमता आहे.
advertisement
उंच मानेच्या व्यक्ती त्यांच्या सभोवतालच्या व इतरांच्या भावनांबद्दल अत्यंत संवेदनशील असतात. अशा व्यक्ती सहानुभूतिशील असतात. अनेकदा त्या त्यांच्या सभोवतालच्या व्यक्तींच्या गरजा पूर्ण करतात. त्यांच्यातली संवेदनशीलता त्यांना दयाळू आणि समजूतदार व्यक्ती बनवते. त्यांच्याकडे अंतर्ज्ञानाची तीव्र भावना असते. निर्णय घेताना ते हृदयाची भावना आणि अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवतात. उंच मान असलेल्या व्यक्ती असाधारण संवाद साधणाऱ्या असतात. त्या स्वतःला स्पष्टपणे व्यक्त करू शकतात. त्यामुळे इतरांना त्यांचे विचार व कल्पना समजणं सोपं होतं.
advertisement
उंच मानेच्या व्यक्तींच्या स्वभावात ज्वलंत कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी दिसते. अशा व्यक्ती बर्‍याचदा लेखन, चित्रकला, संगीत अशा कलात्मक प्रयत्नांमध्ये उत्कृष्ट असतात. उंच मानेच्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक नेतृत्व गुणदेखील असू शकतात. बुद्धी आणि उत्कृष्ट संवादकौशल्यं त्यांना एक प्रभावी नेता बनवतात, जो इतरांना प्रेरणा देऊ शकतो व मार्गदर्शन करू शकतो. अशा व्यक्तींचा सहानुभूतीपूर्ण स्वभाव असूनही ते स्वतःच्या स्वातंत्र्याचीही कदर करतात. ते स्वावलंबी असतात व स्वतःचं व्यक्तिमत्त्व शोधण्यात त्यांना आनंद मिळतो. या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाची मुख्य वैशिष्ट्यं म्हणजे सुंदर, मोहक, हुशार, जिज्ञासू, सहानुभूतिशील, दयाळू, स्पष्टपणे कल्पनाशील, स्पष्टपणे बोलणारे, उत्तम संवादक, स्वतंत्र, स्वावलंबी इत्यादी सांगता येतील. मॉडेलिंग, नृत्य, गायन, अभिनय, छायाचित्रकला, चित्रकला, लेखन, शिक्षक आदी क्षेत्रांतलं करिअर या व्यक्तींसाठी उत्कृष्ट मानलं जातं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुमच्या मानेच्या उंचीवरुन समजतं व्यक्तीमत्त्व, कसं ते जाणून घ्या
Next Article
advertisement
Vasai Virar: नालासोपाऱ्यात मध्यरात्री थरार! नागरिकांनी पाठलाग करून दुचाकी अडवली अन् पिशवी उघडताच पोलिसांचेही डोळे विस्फारले!
नालासोपाऱ्यात मध्यरात्री थरार! नागरिकांनी पाठलाग करून दुचाकी अडवली अन् पिशवी उघड
  • एका दुचाकीस्वाराचा संशय आल्याने काहीजणांनी त्यांचा पाठलाग केला.

  • दुचाकीस्वाराला अडवून त्याची तपासणी केल्यानंतर एकच खळबळ उडाली.

  • नालासोपारामध्ये मध्यरात्री ही घटना घडली.

View All
advertisement