37 वर्षीय हवालदाराचं टोकाचं पाऊल, राहत्या घरातच सगळं संपवलं, सोलापूर पोलिसांत खळबळ
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: काही दिवसांपूर्वीच सोलापुरात पोलीस पत्नीने आत्महत्या केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली होती. आता पोलीस हवालदाराने टोकाचं पाऊल उचललं आहे.
सोलापूर - पोलीस पत्नीचे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना सोलापूर शहर पोलीस दलात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर शहर मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या एका 37 वर्षीय अविवाहित पोलीस हवालदाराने जीवन संपवले. घरातील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेश चंदप्पा कोळी असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
सुरेश कोळी हे शहर मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. ते मूळचे अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील असून नोकरीनिमित्त सोलापुरातील कर्णिकनगर परिसरात वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी 10 वाजता राहत्या घरात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत नातेवाईक शंकर शिवलिंगप्पा आयसार यांनी पोलिसांना माहिती दिली.
advertisement
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार डी.के. डोके हे घटनास्थळी पोहोचले. नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचारी रुग्णालयात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दाखल केला.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
view commentsमृत सुरेश चंदप्पा कोळी कर्णिक नगर या ठिकाणी एकटेच भाड्याच्या खोलीत राहात होते. त्यांचे कुटुंबीय हे अक्कलकोट येथील हैद्रा येथे राहण्यास होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, 1 भाऊ आणि 3 बहिणी असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 12:55 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
37 वर्षीय हवालदाराचं टोकाचं पाऊल, राहत्या घरातच सगळं संपवलं, सोलापूर पोलिसांत खळबळ










