Health Tips : पाय-हातांच्या नखांवरून कळू शकते शरीरात कशाची आहे कमतरता; टाळता येतात मोठ्या समस्या

Last Updated:

Nails and health issues : पायांची नखेही आपल्या आरोग्याबाबत अनेक महत्त्वाचे संकेत देत असतात. नखांचा रंग, पोत, त्यावर दिसणारे डाग किंवा रेषा शरीरात सुरू असलेल्या आतल्या कमतरतेकडे किंवा समस्येकडे इशारा करू शकतात

नखांवर पांढरे डाग दिसण्याचा अर्थ काय?
नखांवर पांढरे डाग दिसण्याचा अर्थ काय?
मुंबई : आपण अनेकदा आपल्या चेहऱ्याकडे, केसांकडे आणि हातांकडे लक्ष देतो, पण पायांची नखेही आपल्या आरोग्याबाबत अनेक महत्त्वाचे संकेत देत असतात. नखांचा रंग, पोत, त्यावर दिसणारे डाग किंवा रेषा शरीरात सुरू असलेल्या आतल्या कमतरतेकडे किंवा समस्येकडे इशारा करू शकतात. अनेकदा पोषक तत्त्वांची कमतरता सर्वप्रथम नखांतील बदलांच्या स्वरूपात दिसून येते, पण लोक ती सामान्य समजून दुर्लक्ष करतात. वेळेत हे संकेत ओळखले तर मोठ्या आरोग्य समस्यांपासून वाचता येऊ शकते.
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, जर पायांची किंवा हातांची नखे पिवळी पडू लागली, जाड झाली किंवा ठिसूळ वाटू लागली, तर ते फंगल इन्फेक्शनसोबतच झिंक आणि व्हिटॅमिन ईच्या कमतरतेचे संकेत असू शकतात. झिंकच्या कमतरतेमुळे नखे कमजोर होतात आणि त्यांची वाढही मंदावते. तर व्हिटॅमिन ईची कमतरता असल्यास नखांची चमक कमी होते आणि ती कोरडी दिसू लागतात. अशा वेळी आहारात नट्स, बिया, हिरव्या भाज्या आणि साबूत धान्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
advertisement
नखांवर पांढरे डाग दिसण्याचा अर्थ काय?
नखांवर पांढरे डाग दिसणे हे अनेकदा कॅल्शियम किंवा झिंकच्या कमतरतेशी संबंधित मानले जाते. बरेच जण हे दुखापतीचा परिणाम समजतात, पण असे डाग वारंवार दिसत असतील तर सतर्क होणे आवश्यक आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे केवळ हाडेच कमजोर होत नाहीत तर नखेही लवकर तुटू लागतात. दूध, दही, चीज, तीळ आणि हिरव्या पालेभाज्या कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास मदत करतात.
advertisement
नखे खूपच पातळ होण्याचा अर्थ
जर पायांची नखे खूपच पातळ झाली असतील किंवा चमच्यासारखी आत वाकू लागली असतील, तर ते आयर्नच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. वैद्यकीय भाषेत याला ‘कोइलोनायकिया’ असे म्हणतात. आयर्नच्या कमतरतेमुळे शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच अ‍ॅनिमिया होऊ शकतो, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे आणि कमजोरीसारख्या समस्या उद्भवतात. अशी लक्षणे दिसल्यास आहारात बीट, डाळिंब, पालक, गूळ आणि कडधान्यांचा समावेश करणे आवश्यक ठरते.
advertisement
लांबच लांब उभ्या रेघा
नखांवर लांबच लांब उभ्या रेघा दिसणे वाढत्या वयाबरोबर सामान्य असू शकते, पण त्या कमी वयातच दिसू लागल्यास ते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, विशेषतः व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेचे संकेत असू शकतात. व्हिटॅमिन बी12ची कमतरता असल्यास नखांसोबतच त्वचाही फिकी पडू लागते आणि हात-पायांत मुंग्या येण्याची जाणीव होऊ शकते. यासाठी दूध, दही, अंडी आणि फोर्टिफाइड अन्नपदार्थांचे सेवन लाभदायक ठरते.
advertisement
advertisement
नखांचा रंग निळा किंवा जांभळट दिसणे..
जर नखांचा रंग निळसर किंवा जांभळट दिसत असेल, तर ते शरीरात ऑक्सिजनची कमतरता किंवा रक्ताभिसरण कमकुवत असल्याचे संकेत असू शकतात. ही स्थिती हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्यांकडेही इशारा करू शकते, त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याशिवाय, नखे खूपच कोरडी राहणे आणि वारंवार तुटणे हे शरीरात पाण्याची आणि आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्सची कमतरता दर्शवते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : पाय-हातांच्या नखांवरून कळू शकते शरीरात कशाची आहे कमतरता; टाळता येतात मोठ्या समस्या
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement