Food Business: नोकरीचा राजीनामा देऊन इंजिनिअर विकतोय बिर्याणी, यशाचा हा फॉर्म्युला तुम्हालाही वाटेल भारी!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Aishwarya Ramnath Taskar
Last Updated:
Food Business: शिर्डीतील एका इंजिनिअर तरुणानं नोकरी सोडून दम बिर्याणी विक्री सुरू केलीये. महिन्याची कमाई 1 ते 2 लाख रुपये असून 10 ते 12 जण या व्यवसायात काम करतात.
अहिल्यानगर: सध्याच्या काळात काही तरुण नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा बिझनेस करण्याकडे वळत आहेत. शिर्डीतील एका हार्डवेअर इंजिनिअरने नोकरीचा राजीनामा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पत्नी वैशाली यांच्या साथीने राहुल रहाणे यांनी सफरॉन दम हैदराबादी बिर्याणीला सुरुवात केली. आता 10 ते 12 जणांना रोजगार दिला असून महिन्याची कमाई 1 ते 2 लाखांपर्यंत आहे. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
राहुल रहाणे यांनी तीन वर्षांपूर्वी सफरॉन दम हैदराबादी बिर्याणीला सुरुवात केली. 2012 ला ते आयटी कंपनीमध्ये सर्व्हर इंजिनियर म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून शिर्डीला येऊन होलसेलचा व्यवसाय सुरू केला. परंतु, लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला. त्यानंतर त्यांनी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला छोटं हॉटेल सुरू केलं. हळुहळू व्यवसाय चांगला चालत गेला आणि मग ते व्यवसायात वाढ करत गेले.
advertisement
दम बिर्याणीला मोठी पसंती
रहाणे यांच्याकडे सफरॉन दम बिर्याणी स्पेशल आहे. त्याचबरोबर चिकन दम बिर्याणी, नॉनव्हेज स्टार्टर, नॉनव्हेज तंदुरी, चिकन लॉलीपॉप, चिकन चिल्ली, चिकन थाळी, मटन थाळी आणि स्पेशल नॉनव्हेज थाळी तसेच व्हेज बिर्याणी, चायनीज स्टार्टर आहे. या व्यवसायातून ते जवळपास एक ते दोन लाखापर्यंत उत्पन्न कमावतात. जवळपास 10 ते 12 लोकांना या व्यवसायातून रोजगार मिळाला आहे.
advertisement
यशाचं गुपित काय?
व्यवसायाच्या सुरुवातीला अनेक अडचणी येतात. पण जर सातत्य ठेवत प्रामाणिक कष्ट केले तर व्यवसायात चांगली प्रगती होते. तसेच व्यवसाय करताना स्वतःला सगळ्या गोष्टी येणे महत्त्वाचे आहे. कारण जर आपण स्वतः कुक असेल तर कितीही अडचण आली तरी आपण त्यावर मात करून व्यवसाय चांगला चालू शकतो, असे राहुल राहाणे सांगतात.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
June 20, 2025 11:45 AM IST
मराठी बातम्या/Food/
Food Business: नोकरीचा राजीनामा देऊन इंजिनिअर विकतोय बिर्याणी, यशाचा हा फॉर्म्युला तुम्हालाही वाटेल भारी!