चपाती की भाकरी, वजन कमी करण्यासाठी काय खावं? आहारतज्ज्ञांनी दिलं उत्तर
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
अनेकजणांच्या दैनंदिन आहारात गव्हाच्या चपातीचा समावेश असतो. भाकरी मात्र काहीजण दररोज खातात.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : आजकाल सर्वांचा कल 'फॅट टू फिट' होण्याकडे असतो. त्यासाठी सकस आहार घेण्यावर अनेकजण भर देतात. वाढत्या वयासोबत ब्लड प्रेशर, शुगर, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास शरिराला जडतात. हे आजार दूर ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत आणि आहारपद्धतीत योग्य बदल करणं आवश्यक आहे.
अनेकजणांच्या दैनंदिन आहारात गव्हाच्या चपातीचा समावेश असतो. भाकरी मात्र काहीजण दररोज खातात. परंतु चपाती लवकर पचते, त्यामुळे ती मोठ्याप्रमाणात खाल्ली जाते. मात्र आहारतज्ज्ञ सांगतात की, भाकरी ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते, त्यातून शरिराला विविध पोषक तत्त्व मिळतात. विशेषतः वजन नियंत्रणात राहतं.
advertisement
भाकरीत आयर्न, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. याचाही आरोग्याला फायदा होतो. दैनंदिन आहारात भाकरीचा समावेश करावा, असं आहार सल्लागार डॉक्टर अमृता महेश कुलकर्णी सांगतात. तसंच चपाती आणि भातामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं. परंतु भाकरीत फायबर असल्यानं तुलनेनं यातून रक्तातली साखर वाढत नाही. शिवाय भाकरीमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
advertisement
कोणती भाकरी सर्वोत्तम?
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कमी कॅलरीज असलेली ज्वारीची भाकरी खाणं उत्तम मानलं जातं. ज्वारी ही पचण्यास हलकी असल्यानं या भाकरीमुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय ज्वारी थंड असते. त्यात भरपूर फायबर असतं. त्यामुळे ही भाकरी कमी प्रमाणात खाल्ली तरी पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि वजन आपोआप कमी होतं.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
July 25, 2024 8:47 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
चपाती की भाकरी, वजन कमी करण्यासाठी काय खावं? आहारतज्ज्ञांनी दिलं उत्तर