कोलेस्ट्रॉल जिऱ्यामुळे होतं कमी, वजनही राहतं नियंत्रणात! महागडे उपाय कशाला?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
स्वयंपाकघरातले सर्व मसाले औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आणि आरोग्यासाठी उपयुक्त असतात. जिऱ्यामुळे तर कोलेस्ट्रॉल, मधुमेह नियंत्रणात राहतं. फक्त त्याचा वापर व्यवस्थित व्हायला हवा. असं केवळ आम्ही नाही, आयुर्वेदिक डॉक्टर पंकज पानुली सांगतात.
जिरं सामान्यत: पावडर किंवा बियांच्या रूपात वापरलं जातं. फोडणीत केवळ सुगंध येण्यासाठी जिऱ्याचा उपयोग होतो असं आपल्याला वाटतं, परंतु जिऱ्याचे फायदे यापलिकडचे आहेत. सकाळी जिऱ्याचं <a href="https://news18marathi.com/lifestyle/healthy-drink-for-summer-drink-this-water-every-morning-to-get-relief-from-stomach-fire-problem-mhpj-1163221.html">पाणी</a> प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय पोटासंबंधित विविध विकारांवर <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/food-for-good-sleep-eat-these-5-foods-at-night-to-get-good-and-peaceful-sleep-mhpj-1166383.html">आराम</a> मिळतो.
advertisement
advertisement
advertisement
जिऱ्याचं <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/know-everyday-how-much-water-you-should-drink-in-summer-season-l18w-mhkd-1163627.html">पाणी</a> कसं बनवायचं पाहूया. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, चमचाभर जिरं रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी गाळून हे पाणी प्या. रिकाम्यापोटी हे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. लक्षात घ्या, गरोदर <a href="https://news18marathi.com/lifestyle/women-health-ladies-should-follow-these-5-habits-to-stay-fit-healthy-balance-hormones-mhpj-1165046.html">महिला</a> आणि मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांनी हे पाणी पिणं धोक्याचं ठरू शकतं.
advertisement


