तेल की तूप, जेवणात नेमकं काय वापरावं? आरोग्यासाठी काय चांगलं?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
भारतीय किचनमध्ये विविध मसाल्यांचा वापर होतो. जेवणात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थात औषधी गुणधर्म दडलेले असतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. काहीजण जेवणात तेलाचा वापर करतात, तर काहीजण तूप वापरतात. (रिया पांडे, प्रतिनिधी / नवी दिल्ली)
advertisement
advertisement
तेलात फॅटी ऍसिड असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्या तुलनेत तुपात फॅटी ऍसिडचं प्रमाण कमी असतं. याउलट तुपात फॅट असतात जे हृदयासाठी धोकादायक ठरतात. तरीही तेल असो किंवा तूप असो, त्याचा योग्य आणि प्रमाणात वापर झाला तरच ते आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे या दोन्ही पदार्थांचा शक्य होईल तेवढा कमी वापर करावा, असं डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
त्याचबरोबर कोणत्याही तेलाचा किंवा तुपाचा मांसाहारी पदार्थांमध्ये जपून वापर करावा. जर या पदार्थांमध्ये जास्त तेल, तूप घातल्यास कोलेस्ट्रॉल किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. अति तेलकट, अति तिखट पदार्थ आरोग्यासाठी प्रचंड धोक्याचे असतात.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.