हार्ट अटॅकची लक्षणं खूप साधी, दुर्लक्ष करू नका; असं झाल्यास डॉक्टरांकडे जा!

Last Updated:

शरिराच्या सर्व अवयवांना हृदयापासून रक्तपुरवठा होतो. त्यामुळे हृदयाच्या नसांवर प्रचंड ताण येतो. काहीवेळा नसा सुजू शकतात.

अजिबात वेळ वाया घालवू नये.
अजिबात वेळ वाया घालवू नये.
काजल मनोहर, प्रतिनिधी
जयपूर : काही आजारपण अगदी अचानक उद्भवतात. परंतु त्या विशिष्ट आजाराचे हलके संकेत आपलं शरीर आपल्याला देत असतं. आपल्याला केवळ ते ओळखता येत नाहीत इतकंच. हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्याबाबतही असंच होतं. शरीर आपल्याला अटॅकचे संकेत देतं, हे संकेत नेमके कोणते, जाणून घेऊया.
हार्ट स्पेशलिस्ट सुनिल शर्मा सांगतात की, कष्टाचं काम केल्यानंतर थकणं सामान्य आहे. परंतु काहीही कष्ट न करता शरिरात थकवा जाणवत असेल तर मात्र काळजी घेणं आवश्यक आहे. हा भविष्यात येणाऱ्या हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो. जेव्हा हृदयाच्या धमन्या कोलेस्ट्रॉलमुळे बंद होतात किंवा आकुंचित पावतात तेव्हा हृदयाचं कार्य वाढतं, अशावेळी शरीर जास्त थकतं.
advertisement
शरिराच्या सर्व अवयवांना हृदयापासून रक्तपुरवठा होतो. त्यामुळे हृदयाच्या नसांवर प्रचंड ताण येतो. काहीवेळा नसा सुजू शकतात. अशावेळी हाताच्या पंजांवर आणि पायांच्या तळव्यांवर सूज दिसून येते. काहीवेळा ओठ निळे पडतात. ही लक्षणं सर्वात धोकादायक मानली जातात. महिन्याभरात 2-3 वेळा असं झालं, तर अजिबात वेळ न दवडता डॉक्टरांकडे जावं.
advertisement
छातीत जळजळ होणं
हे हार्ट अटॅकचं सर्वात मूळ लक्षण आहे. छातीत जळजळ होत असेल तर हे अपचन किंवा ऍसिडिटी असू शकते, त्यामुळे आंबट ढेकरही येऊ शकतात. मात्र ही हार्ट अटॅकची सुरूवात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु हार्ट अटॅकची जळजळ साधीसुधी नसते, तर सोबत जीव अस्वस्थ आणि घाबराघुबराही होतो.
श्वास घ्यायला त्रास होणं
पायऱ्यांवरून धावत वर-खाली चढउतार करणारे आपण एका वयानंतर थकून जातो. मात्र वाढत्या वयासोबत येणारा थकवा सर्वसामान्य आहे. परंतु जर चालतानासुद्धा अस्वस्थ वाटत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हृदयासंबधित आजार असू शकतो. विशेषतः फुप्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून योग्य उपचार घ्या.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
हार्ट अटॅकची लक्षणं खूप साधी, दुर्लक्ष करू नका; असं झाल्यास डॉक्टरांकडे जा!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement