उन्हाळ्यात 'हे' पदार्थ खावे, हृदय राहतं सुदृढ, हार्ट अटॅकचा धोका होतो कमी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
प्रत्येकाने नेहमीच आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावं. उन्हाळ्यात तर जास्त तेलकट पदार्थ खाणं पूर्णपणे टाळावं. शक्य असल्यास मांसाहारही कमी करावा, कारण ते गरम असतं.
रिया पांडे, प्रतिनिधी
दिल्ली : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आजारपणं एवढी वाढली आहेत की, सतत डॉक्टरांकडे जावं लागतं. पूर्वी एका विशिष्ट वयानंतर हार्ट अटॅकचा धोका असायचा, आता मात्र अगदी तरुणपणातही हार्ट अटॅक येतो. जे अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे केवळ हृदयाचीच नाही, तर संपूर्ण शरिराची काळजी घ्यायला हवी. आपलं आयुष्य कितीही धावपळीचं असलं तरी 8 तासांची पूर्ण झोप, वेळच्या वेळी जेवण, दररोज किमान अर्धा तास व्यायाम या सवयी पाळायलाच हव्या. सर्वाधिक लक्ष द्यायला हवं ते आहारावर. कारण त्यातूनच शरिराला पोषक तत्त्व मिळतात.
advertisement
डॉक्टर असीम सांगतात की, प्रत्येकाने नेहमीच आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावं. उन्हाळ्यात तर जास्त तेलकट पदार्थ खाणं पूर्णपणे टाळावं. शक्य असल्यास मांसाहारही कमी करावा, कारण ते गरम असतं. ज्यामुळे शरिराचं तापमान वाढू शकतं.
आपल्या आहारात हंगामी फळांचा समावेश असायला हवा, असं आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात असलेल्या अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे ते फायदेशीर ठरतं. तसंच आपण काकडीसुद्धा खाऊ शकता. काकडीत व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि सोडियम भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. शिवाय कलिंगड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळीही व्यवस्थित राहते.
advertisement
त्याचबरोबर पिच फळ आणि पपई खाल्ल्याने पोटासंबंधित व्याधी दूर होतात. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. आहारात ताक आणि दह्याचा समावेश करणंही फायदेशीर ठरतं. त्यामुळे आपलं हृदय सुदृढ राहतं आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो, असं डॉक्टर सांगतात.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Delhi
First Published :
May 14, 2024 8:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात 'हे' पदार्थ खावे, हृदय राहतं सुदृढ, हार्ट अटॅकचा धोका होतो कमी!