तुमच्याही पायांवर दिसतायत ही लक्षणं? वेळीच काळजी घ्या नाहीतर कधीही येऊ शकतो हार्ट अॅटॅक
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
आपल्या पायांमध्ये होत असलेले बदल लक्षात आले तर अगदी सुरुवातीच्या टप्प्यातही हृदयविकारांवर उपचार मिळवता येऊ शकतात. आपण या प्राणघातक विकारांपासून स्वतःचं पूर्णपणे संरक्षण करू शकतो. अशा काही लक्षणांची माहिती घेऊ या.
मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अॅटॅक आणि विविध हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे कोणत्याही वयोगटातल्या व्यक्ती हार्ट अॅटॅकच्या बळी ठरत आहेत. छातीत दुखणं हे हृदयविकाराचं मुख्य लक्षण मानलं जातं; मात्र या समस्येची लक्षणं अधिक व्यापक असू शकतात. काही वेळा हृदयाशी संबंधित समस्यांची लक्षणं पायांमध्येही दिसू शकतात. बहुतांश जण त्याकडे लक्ष देत नाहीत. आपल्या पायांमध्ये होत असलेले बदल लक्षात आले तर अगदी सुरुवातीच्या टप्प्यातही हृदयविकारांवर उपचार मिळवता येऊ शकतात. आपण या प्राणघातक विकारांपासून स्वतःचं पूर्णपणे संरक्षण करू शकतो. अशा काही लक्षणांची माहिती घेऊ या.
पायांमध्ये वेदना, पेटके येणं किंवा बधीरपणा जाणवणं : पाय सतत दुखणं, विशेषत: रात्री होणाऱ्या वेदना, चालताना होणारा त्रास हे हार्ट डिसिजेसचं लक्षण असू शकतं. पायांमध्ये रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे या समस्या जाणवतात.
पायांचा रंग बदलणं : जर पायांचा रंग पिवळा, मातकट किंवा निळा झाला तर हे हृदय आजारी असल्याचं लक्षण असू शकतं. रक्ताभिसरणाच्या समस्यांमुळे पायांचा रंग बदलू शकतो.
advertisement
पायांना झालेली जखम लवकर बरी न होणं : जर पायाला झालेली जखम लवकर बरी होत नसेल किंवा ही जखम पुन्हा चिघळत असेल तर हे रक्ताभिसरणाच्या समस्येचं लक्षण असू शकतं. डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्येही ही समस्या दिसून येते.
advertisement
पायावरचे केस गळणं : पायांवरचे केस कमी होणं किंवा गळणं हे शरीराच्या सर्व भागांमध्ये पुरेसं रक्त पोहोचत नसल्याचं लक्षण असू शकतं. हृदयाची गती कमी झाल्यामुळे ही समस्या जाणवू शकते.
पायांच्या नखांची वाढ मंदावणं : पायांची नखं फार हळूहळू वाढत असतील किंवा त्यांचा रंग बदलत असेल तर हे रक्ताभिसरणाच्या समस्येचं लक्षण असू शकतं. आपल हृदय नीट काम करत नसल्याची ही सूचना आहे.
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा
ही लक्षणं आरोग्याच्या इतर समस्यांमुळेदेखील दिसू शकतात. जर तुम्हाला यांपैकी कोणतीही लक्षणं दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. याशिवाय हार्ट डिसिजेसचा धोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे. नियमित व्यायाम करावा, संतुलित आहार घ्यावा आणि धूम्रपान टाळावं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 08, 2024 11:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुमच्याही पायांवर दिसतायत ही लक्षणं? वेळीच काळजी घ्या नाहीतर कधीही येऊ शकतो हार्ट अॅटॅक