IND vs PAK : 5 बॅटर, 3 ऑलराऊंडर, 3 बॉलर, पाकिस्तानविरुद्ध अशी असणार भारताची Playing XI!

Last Updated:

आशिया कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने युएईचा धुव्वा उडवला. युएईविरुद्धच्या या विजयानंतर टीम इंडिया आता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

5 बॅटर, 3 ऑलराऊंडर, 3 बॉलर, पाकिस्तानविरुद्ध अशी असणार भारताची Playing XI!
5 बॅटर, 3 ऑलराऊंडर, 3 बॉलर, पाकिस्तानविरुद्ध अशी असणार भारताची Playing XI!
दुबई : आशिया कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने युएईचा धुव्वा उडवला. युएईचा 13.1 ओव्हरमध्ये 57 रनवर ऑलआऊट केल्यानंतर भारताने हे आव्हान फक्त 4.3 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून पार केलं. युएईविरुद्धच्या या विजयानंतर टीम इंडिया आता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. रविवार 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडिया युएईविरुद्धच्या सामन्यातीलच प्लेयिंग इलेव्हन घेऊन मैदानात उतरणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया कुणाला संधी देणार? याचं उत्तर दिलं आहे. युएईविरुद्ध जी टीम मैदानात उतरली, तीच टीम पाकिस्तानविरुद्धही खेळेल. भारतीय टीममध्ये कोणताही बदल होणार नाही, असं मत अजय जडेजाने व्यक्त केलं आहे. आशिया कपचं प्रसारण करणाऱ्या सोनी स्पोर्ट्ससोबत अजय जडेजा बोलत होता.
युएईविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 8 बॅटर घेऊन खेळणं गरजेचं नव्हतं, पण आता असं केलंच आहे तर पाकिस्तानविरुद्धही हीच टीम खेळली पाहिजे, असं अजय जडेजा म्हणाला आहे.
advertisement

पाकिस्तानविरुद्ध भारताची प्लेयिंग इलेव्हन

5 बॅटर- शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन
3 ऑलराऊंडर- हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल
3 बॉलर- कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 5 बॅटर, 3 ऑलराऊंडर, 3 बॉलर, पाकिस्तानविरुद्ध अशी असणार भारताची Playing XI!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement