advertisement

Success Story: नोकरी सोडली अन् 'JFC' सुरू केलं, नाशिकच्या तरुणाने महिन्याला बक्कळ कमाई

Last Updated:

बी. कॉमचे शिक्षण घेऊन कॉर्पोरेट जगतात नोकरी करणाऱ्या एका तरुणाने कोरोना महामारीनंतर नोकरीच्या मागे न लागता केवळ 5 हजार रुपयांच्या भांडवलावर स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

+
Success

Success Story: नामांकित कंपनीतल्या नोकरीवर पाणी फिरवलं अन् आवड जोपासली, नाशिकचा मुजाहिद कादरी छंदातून कमावतोय हजारो रूपये

नाशिक: बी. कॉमचे शिक्षण घेऊन कॉर्पोरेट जगतात नोकरी करणाऱ्या एका तरुणाने कोरोना महामारीनंतर नोकरीच्या मागे न लागता केवळ 5 हजार रुपयांच्या भांडवलावर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज, 'जेएफसी' (JFC) या नावाचा बर्गर आणि सँडविच विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मुजाहिद कादरी नावाच्या तरूणाची मासिक कमाई 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. नोकरीपेक्षा धंद्यात जास्त पैसा असल्याची प्रचिती त्यांनी त्यांच्या प्रवासातून दिली आहे.
पुणे ते नाशिक: नोकरीतील चढ-उतार
मुजाहिद कादरी यांनी बी. कॉमचे शिक्षण पूर्ण करून पुण्यातल्या एका नामांकित कंपनीत नोकरी मिळवली होती. काही वर्षे सर्व सुरळीत सुरू असताना, अचानक काही कारणांमुळे त्यांना ती नोकरी सोडावी लागली. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळाली, पण तिथेही त्यांना जास्त काळ थांबता आले नाही. नोकरीतील या अस्थिरतेमुळे त्यांनी आपला मोर्चा आपल्या मूळ गावी, नाशिककडे वळवला. लहानपणापासून स्वयंपाकाची आवड असल्याने, त्यांनी नाशिकमधील एका कॅफेमध्ये 'शेफ'ची नोकरी मिळवली आणि आपले स्वप्न पूर्ण केले. मात्र, याच दरम्यान आलेल्या कोरोना महामारीमुळे त्यांना हा जॉबदेखील सोडावा लागला.
advertisement
नोकरी सोडली, उद्योगाचे स्वप्न पाहिले
कोरोनानंतर मुजाहिद यांचा नोकरी करण्यातील रस पूर्णपणे मावळला. या रिकाम्या वेळेत त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला. परंतु, नक्की काय सुरू करावे, हा प्रश्न होता. त्यावेळी त्यांना पुण्यात पाहिलेल्या 'कोल्ड सँडविच'ची कल्पना आठवली. नाशिकमध्ये ही संकल्पना नवी असल्याने, त्यांनी कोल्ड सँडविच विक्रीतून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. हळूहळू या क्षेत्रात त्यांना यश मिळू लागले. त्यानंतर त्यांनी नाशिकमधील दूध बाजार परिसरात सँडविच आणि बर्गरचा आपला गाडा लावला.
advertisement
5 हजारांचे झाले 70 हजार
मुजाहिद कादरी सांगतात, “हा व्यवसाय मी केवळ 5 हजार रुपयांच्या छोट्या भांडवलातून सुरू केला होता. आज याच व्यवसायातून मला नोकरीपेक्षा कितीतरी जास्त पैसा मिळत आहे.” लोकल 18 सोबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या त्यांची मासिक कमाई सरासरी 60 ते 70 हजार इतकी आहे. कॉर्पोरेटमधील नोकरीच्या असुरक्षिततेतून बाहेर पडून, आपल्या स्वयंपाकाच्या आवडीला व्यवसायात बदलणाऱ्या मुजाहिद कादरी यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
view comments
मराठी बातम्या/Food/
Success Story: नोकरी सोडली अन् 'JFC' सुरू केलं, नाशिकच्या तरुणाने महिन्याला बक्कळ कमाई
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement