कधी गाडीवर फिरून विकली मिसळ, आता खाण्यासाठी रांगा, शिर्डीच्या अण्णाची वर्षाची कमाई 40 लाख!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Aishwarya Ramnath Taskar
Last Updated:
Famous Misal: कधी गाडीवर फिरून मिसळ विकणाऱ्या अरुण हजारे यांची मिसळ शिर्डीचा प्रसिद्ध ब्रँड झाला आहे. ते मिसळपाव आणि पुरी मिसळ विकतात.
अहिल्यानगर: सध्याच्या काळात खाद्यपदार्थांच्या व्यवसायाकडे अनेकजण वळत आहेत. विशेषतः प्रत्येक शहरात एखादे तरी फेमस मिसळ सेंटर असतेच. अहिल्यानगरमधील शिर्डी येथे असेच एक प्रसिद्ध मिसळ सेंटर असून, इथं खवय्यांच्या अक्षरशः रांगा लागतात. कधीकाळी गाडीवर मिसळ विकणारे अरुण हजारे यांची ‘अण्णा मिसळ’ आता फेमस ब्रँड झालीये. यातून ते वर्षाला 30 ते 40 लाखांची कमाई करत आहेत. लोकल18 च्या माध्यमातून त्यांच्याच व्यावसायिक यशाबाबत जाणून घेऊ.
advertisement
अरुण हजारे हे मिसळ विकून चांगली कमाई करतायत. सुरुवातीला ते गाडीवर फिरवून मिसळ विकत होते. आता ‘अण्णा मिसळ’ म्हणून हॉटेल चालू केले. त्यांच्याकडे मिसळ पाव आणि मिसळ पुरी अशा दोन प्रकारच्या मिसळ भेटतात. शिर्डी शहरातील लोकप्रिय मिसळ सेंटर म्हणून ‘अण्णा मिसळ’ हे ठिकाण ओळखलं जातं. व्यवसायात हातभार म्हणून अरुण हजारे यांचा मुलगा देखील हाच व्यवसाय करत आहे.
advertisement
12 जणांना रोजगार
हजारे यांच्याकडे सुरुवातीला फक्त मिसळपाव भेटत असे. पण त्यात वाढ करत, ग्राहकांची आवड लक्षात घेता त्यांनी दोन प्रकारच्या मिसळ सुरू केल्या. एक प्रकार म्हणजे पाववाली मिसळ. ही गरमागरम मिसळपाव फक्त 50 रुपयाला मिळते. दुसरा प्रकार म्हणजे गरमागरम पुरीवाली मिसळ, जी 60 रुपयाला भेटते. स्पेशल मिसळ थाळी 80 रुपयाला मिळते. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण मिसळ मोठ्या चवीने खातात. या व्यवसायातून जवळपास 12 लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
advertisement
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी उद्योजक सुद्धा मिसळचा व्यवसाय यशस्वीरित्या करू शकतो. फक्त व्यवसायात संयम, सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला तर यश मिळतं. आता मुलगा देखील याच व्यवसायात असून, तो चांगल्या प्रकारे व्यवसाय सांभाळत असल्याचं अरुण हजारे सांगतात.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
June 10, 2025 5:42 PM IST
मराठी बातम्या/Food/
कधी गाडीवर फिरून विकली मिसळ, आता खाण्यासाठी रांगा, शिर्डीच्या अण्णाची वर्षाची कमाई 40 लाख!