Soft Tilgul Ladoo : बिनपाकाचे मऊसूत तीळ गुळाचे लाडू बनवायचेत? तोंडात विरघळतील हे लाडू, पाहा सोपी रेसिपी

Last Updated:

Soft Tilgul Ladoo Recipe In Marathi : तुमच्या घरात वयोवृद्ध मंडळी किंवा लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम तिळगुळ लाडू तुम्ही सहज बनवू शकता. विशेष म्हणजे हे बिनपाकाचे लाडू आहेत.

तिळगूळ लाडू बनवण्याची सोपी पद्धत
तिळगूळ लाडू बनवण्याची सोपी पद्धत
मुंबई : तुम्ही या मकरसंक्रांतीला तिळगुळाचे लाडू बनवणार असाल आणि तुम्हाला अगदी मऊ लाडू बनवायचे असतील तर येथे आम्ही तुम्हाला एक सोपी रेसिपी सांगत आहोत. तुमच्या घरात वयोवृद्ध मंडळी किंवा लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम तिळगुळ लाडू तुम्ही सहज बनवू शकता. विशेष म्हणजे हे बिनपाकाचे लाडू आहेत. म्हणजे पाक तयार न करता तुम्ही ते अगदी सहज बनवू शकता आणि ते बनवण्यासाठी वेळ देखील खूप कमी लागतो. तुम्ही अर्ध्या तासात हे लाडू बनवू शकता.
तिळगूळ लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- साधा गूळ
- पॉलिश नसलेले तीळ
- घरचं साजूक तूप
- भाजलेले शेंगदाणे
- वेलचीपूड
तिळगूळ लाडू बनवण्याची सोपी पद्धत
सर्वप्रथम एका पॅनमध्ये मंद आचेवर तीळ भाजून घ्या. तिळाचा रंग सोनेरी होईपर्यंत ते भाजा. तिळ तडतडायला लागले की समजून जा ते भाजले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि थंड होऊ द्या. यानंतर शेंगदाने मिक्सरमध्ये वाटून घ्या. तिळ थंड झाल्यानंतर त्यातील एक वाटी तिळ वेगळे काढून घ्या आणि उरलेले सर्व तिळ मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. तिळ वाटून घेताना मिक्सर चालू बंद करत राहा. सलग चालू ठेवल्यास त्यातून तेल सुटू शकतं.
advertisement
advertisement
आता तीळ पावडर, गूळ, तूप आणि वेलची पावडर हे सर्व मिक्सरमध्ये एकत्र करून वाटून घ्या. यानंतर त्यात शेंगदाण्याची तयार केलेली पावडर घाला. यानंतर सुरुवातीला बाजुला काढून ठेवलेले भाजलेले तिळ त्यात घाला. आता हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या आणि त्याचे तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू बांधून घ्या आणि त्यांचा अस्वाद घ्या. हे लाडू महिनाभर टिकतात.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Soft Tilgul Ladoo : बिनपाकाचे मऊसूत तीळ गुळाचे लाडू बनवायचेत? तोंडात विरघळतील हे लाडू, पाहा सोपी रेसिपी
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement