केळीच्या पानात ग्रेव्ही सोबत उकडलेले मोमोज कधी खाल्लेत का? कोकणपट्ट्याच्या जेवणाची मिळेल चव, पाहा Video

Last Updated:

या युनिक खाद्य पदार्थाला पात्रा मोमोज असे म्हणतात. हे पात्रा मोमोज खाण्यासाठी मुंबईकर खवय्येही या ठिकाणी आवर्जून गर्दी करतात.

+
News18

News18

ठाणे, 28 डिसेंबर : आपल्यातील अनेकांना मोमोज खायला अतिशय आवडतात. यामध्ये आजवर तुम्ही चिकन किंवा व्हेज, फ्राईड किंवा स्टीम केलेले मोमोज खाल्ले असतील. पण कधी केळीच्या पानात ग्रेव्ही सोबत उकडून घेतलेले मोमोज खाल्ले आहेत का? नाही ना? तर हेच मोमोज तुम्हाला ठाण्यात खायला मिळतील. या युनिक खाद्य पदार्थाला पात्रा मोमोज असे म्हणतात. हे पात्रा मोमोज खाण्यासाठी मुंबईकर खवय्येही या ठिकाणी आवर्जून गर्दी करतात.
कशी झाली पात्रा मोमोजची सुरुवात? 
ठाण्याच्या अष्टविनायक चौक परिसरात असलेले हे स्पाइस फाइव सिक्स नामक फूड ट्रक एक तरुणी चालवते. सृष्टी कांबळे असे या तरुणीचे नाव आहे. सृष्टीने हॉटेल मॅनेजमेंट केले असल्यामुळे तिला विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्याची भरपूर आवड आहे. पात्रा मोमोजची संकल्पना देखील तिची स्वतःचीच आहे. सृष्टी कोकणपट्ट्यावर राहत असल्यामुळे केळीच्या पानात जेवण करण्याची सवय तिला होती. त्यामुळे एकदा सहजच मोमोज तयार करताना तिने पात्रा मोमोज म्हणजेच केळीच्या पानात मोमोज तयार केले आणि घरातल्यांना ते खाऊ घातले. सर्वांना ते आवडले देखील म्हणून तीने तिच्या फूड ट्रकवर आता हे मोमोज विकण्यास सुरु केले आहे.
advertisement
ऑथेंटिक चिकन मोमोज खाण्यासाठी हे फूड ट्रक नक्कीच एक उत्तम पर्याय आहे. येथील प्राईज रेंज देखील अतिशय पॉकेट फ्रेंडली आहे. अगदी 40 ते 100 रुपयांचा आत मोमोज सोबत आणखीन स्नॅक्स पदार्थांचा या ठिकाणी आस्वाद घेता येईल.
advertisement
पात्रा मोमोज हे चिकन त्याचप्रमाणे पनीरचे देखील तयार केले जातात. पात्रा मोमोज हे केळीच्या पानात ग्रेव्ही सोबत उकडून घेतले जातात. पात्रा मोमो सोबत असणारी ग्रेव्ही हे कोकण आणि महाराष्ट्रातले इतर ठिकाणचे एकत्र कॉम्बिनेशन आहे. त्याबरोबरच केळीच्या पानामुळे त्या मोमोजना विशिष्ट चव येते. या पात्रा मोमोजना कोकणपट्ट्याच्या जेवणाची चव आहे, अशी माहिती सृष्टी कांबळेने दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
केळीच्या पानात ग्रेव्ही सोबत उकडलेले मोमोज कधी खाल्लेत का? कोकणपट्ट्याच्या जेवणाची मिळेल चव, पाहा Video
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं सगळं सांगितल
  • सरतं वर्ष २०२५ हे सोनं-चांदीसाठी ऐतिहासिक ठरलं.

  • सोनं-चांदीच्या दरात आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांना शेअर बाजारापेक्षा जबरदस्त रिट

  • आता पुढील २०२६ वर्षात कोण अधिक रिटर्न देईल, यावर एक्सपर्टने भाष्य केलं आहे.

View All
advertisement