Ganesh Chaturthi 2025: बाप्पासाठी आता घरपोहोच मिळणार खास मोदक, मुंबईत अनोखा महोत्सव, कशी करायची नोंदणी?

Last Updated:

Ganesh Chaturthi 2025: मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ मानला जातो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मोदकांना प्रचंड मागणी असते.

Ganesh Chaturthi 2025: बाप्पासाठी आता घरपोहोच मिळणार खास मोदक, मुंबईत अनोखा महोत्सव, कशी करायची नोंदणी?
Ganesh Chaturthi 2025: बाप्पासाठी आता घरपोहोच मिळणार खास मोदक, मुंबईत अनोखा महोत्सव, कशी करायची नोंदणी?
मुंबई: यंदा 27 ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला वेग आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोदकांची मागणी मोठ्या प्रमाणावर असणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी चविष्ट व पारंपरिक पद्धतीने बनवलेले मोदक उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) अर्थसहाय्यित महिला बचत गटांमार्फत 'मोदक महोत्सव 2025'चं आयोजन करण्यात आलं आहे.
या उपक्रमाअंतर्गत मुंबईकरांना दर्जेदार तसेच स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेले उकडीचे आणि तळलेले मोदक घरपोच मिळणार आहेत. नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी 21 ते 25 ऑगस्ट 2025 दरम्यान https://shgeshop.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी याच कालावधीत आपली ऑर्डर नोंदवावी.
advertisement
ऑर्डर नोंदणी पूर्ण झाली की, 27 ऑगस्ट म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी ऑर्डरनुसार मोदक थेट घरी वितरित केले जातील. या अगोदर महिला बचत गटांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने 'पुरणपोळी महोत्सव' आयोजित केला होता. त्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवरच 'मोदक महोत्सव 2025' चं आयोजन करण्यात आलं आहे.
नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी या महोत्सवाची माहिती दिली. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, स्वयंपूर्ण बनवणे आणि त्यांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, हा उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांनी या गटांना नवनवीन उपक्रमांसाठी प्रोत्साहन दिलं आहे.
advertisement
मुंबईतील महिला बचत गटांनी पारंपरिक पद्धतीने व प्रेमाने तयार केलेले मोदक गणेशभक्तांना निश्चितच आवडतील. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पासाठी खास मोदक घरी मागवायचे असतील तर 'मोदक महोत्सव 2025'साठी वेळेत नोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/Food/
Ganesh Chaturthi 2025: बाप्पासाठी आता घरपोहोच मिळणार खास मोदक, मुंबईत अनोखा महोत्सव, कशी करायची नोंदणी?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement