क्लासिक, ग्रिल्ड ते आफ्रिकन बेली; ‘इथं’ मिळतायत श्वारमाचे तब्बल 77 प्रकार Video

Last Updated:

दोन भावंडांनी मिळून 77 वेगवेगळ्या प्रकारच्या श्वारमा पदार्थाचे दुकान सुरु केले आहे. मुंबईतील सर्वात तिखट श्वारमाची उपमा खवय्यांनी येथील श्वारमाला दिली आहे. 

+
News18

News18

लतिका तेजाळे, प्रतिनिधी
 मुंबई : मुंबई सारख्या शहरात आपण ही एखादा लहानसा व्यवसाय करावा असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यात मराठी भावंडांची एकी जमली तर ते काही ही करू शकतात. याच एक उत्तम उदाहरण म्हणजेच ओम आणि प्रसन्न बिडये होय. मुंबईतील लालबाग परळ मधील या दोन भावंडांनी मिळून 77 वेगवेगळ्या प्रकारच्या श्वारमा पदार्थाचे दुकान सुरु केले आहे. मुंबईतील सर्वात तिखट श्वारमाची उपमा खवय्यांनी येथील श्वारमाला दिली आहे. 
advertisement
कशी झाली सुरुवात? 
मुंबईतील लालबाग, परळ परिसरात असलेल्या हॉटबर्ड दुकानात 77 वेगवेगळ्या प्रकारच्या श्वारमाचा आस्वाद खवय्यांना घेता येईल. हे दुकान दोन मराठी भावंडांनी मिळून सुरू केले आहे. ओम बिडये आणि प्रसन्न बिडये असे दोघांचे नाव आहे. पेशाने ओम बिडये हे एक डिझायनर आहेत. त्याचप्रमाणे प्रसन्न बिडये हे एक प्रोफेशनल शेफ आहेत. एक प्रोफेशनल शेफ असल्यामुळे प्रसन्न यांना भारताच्या सर्व प्रकारच्या मिरची आणि मसाल्यांचे ज्ञान अवगत आहे.
advertisement
या ठिकाणचे इंटरेस्टिंग मेनू खवय्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे हा श्वर्माचा व्यवसायात ते भारतातील विविध भागाचे मसाल्यांची चव खव्यांपर्यंत पोहोचवत आहेत. क्लासिक, ग्रिल्ड, माईल्ड बर्ड, होट बर्ड, बार्बेक्यू होट, सुप्रीम हॉट, डीलक्स हॉट, स्मोकी, फिएरी हॉट, नाशविले स्पेशल हॉट, क्युबानीक हॉट, आफ्रिकन बेली असे 77 वेगवेगळ्या प्रकारच्या श्वारमा या ठिकाणी मिळतात. 
advertisement
ओम आणि प्रसन्न यांचे आई वडील दोघे नोकरी करणारे असून ही त्यांनी मुलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पुरेपूर साथ दिली. नोकरी करून व्यवसाय करणे शक्य नसल्यामुळे लाखांचा पगार असलेली ताज हॉटेलची नोकरी सोडून प्रसन्न बिडये यांनी पूर्ण लक्ष व्यवसायात केंद्रित केले. सुरुवातीच्या काळात दिवसाला फक्त 20 ते 25 श्वारमा विकल्या जात होते. कालांतराने या व्यवसायाची वृद्धी होऊन आता दिवसाला या ठिकाणी 160 श्वारमा विकले जातात. येथील विविध श्वारमा 40 ते 160 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. अतिशय पॉकेट फ्रेंडली किंमतीत मिळणारे हे श्वारमा खाण्यासाठी मुंबईकर खवय्ये या ठिकाणी आवर्जून गर्दी करतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
क्लासिक, ग्रिल्ड ते आफ्रिकन बेली; ‘इथं’ मिळतायत श्वारमाचे तब्बल 77 प्रकार Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement