खवय्यांसाठी अनोखी मेजवानी, अमेरिकेचा BYOB पदार्थ मिळतोय पुण्यात, तुम्ही चाखलीये का चव?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
खवय्यांसाठी अनोखी मेजवानी आता पिंपरी-चिंचवडमध्ये चाखायला मिळत आहे. अमेरिकेतील लोकप्रिय 'BYOB' फूड ट्रेंड आता पुण्यातही पोहोचला आहे.
पुणे : खवय्यांसाठी अनोखी मेजवानी आता पिंपरी-चिंचवडमध्ये चाखायला मिळत आहे. अमेरिकेतील लोकप्रिय 'BYOB' (Bring Your Own Bag) फूड ट्रेंड आता पुण्यातही पोहोचला आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर परिसरात असलेल्या तोफीक शेख या तरुणाने 'चिपझ वे' या नावाने या ट्रेंडची सुरुवात केली असून, अल्पावधीतच हे ठिकाण खवय्यांच्या आवडत्या यादीत आहे.
तोफीक शेख यांनी एका वर्षाचा अमेरिकेचा अनुभव घेतल्यानंतर पुण्यात ही कल्पना प्रत्यक्षात आणली. अमेरिकेत 'BYOB' हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे, जिथे ग्राहक स्वतःच्या आवडीनुसार चिप्सचे पॅकेट घेऊन येतात आणि त्यात हव्या त्या टॉपिंग्ससह ते तयार करून दिलं जातं. हाच प्रयोग त्यांनी ‘चिपझ वे’ मध्ये केला असून, ग्राहक स्वतःचं चिप्स पॅकेट घेऊन येऊ शकतात किंवा दुकानात उपलब्ध असलेल्या पॅकेट्स वापरू शकतात.
advertisement
या पॅकेटमध्ये चीज, पनीर सॉस, व्हेजीज, चिकन अशा टॉपिंग्स टाकून एक भन्नाट फ्यूजन डिश तयार केली जाते. ग्राहकांनी आणलेल्या चिप्स पॅकेटसाठी व्हेज डिश 59 रुपये आणि नॉन-व्हेज डिश 89 रुपयांना उपलब्ध आहे. तर दुकानातील पॅकेट वापरल्यास हेच प्रकार अनुक्रमे 79 रुपये आणि 109 रुपयांना मिळतात.
advertisement
'चिपझ वे' ला मागील तीन महिन्यांत जोरदार प्रतिसाद मिळत असून, रोजच्या-रोज येथे चांगलीच गर्दी पाहायला मिळते. खवय्यांना काहीतरी हटके आणि मजेशीर अनुभव देण्याच्या हेतूने या व्यवसायाची सुरुवात केली आहे.
या व्यवसायात तोफीकला त्याची आईही मदत करत आहे. बरेच प्रकारचे चिप्स आणून हे बनवल जात. त्यामुळे याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jun 29, 2025 3:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
खवय्यांसाठी अनोखी मेजवानी, अमेरिकेचा BYOB पदार्थ मिळतोय पुण्यात, तुम्ही चाखलीये का चव?








