ट्रेनमध्ये तुमची आरक्षित सीट दुसऱ्याने बळकावलीय? लगेच करा 'हे' काम, मिनिटांत सीट रिकामी होईल!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
रेल्वे प्रवासात आरक्षित सीटवर दुसऱ्याने बसल्यास प्रवाशांनी घाबरून न जाता TTE कडे तक्रार करावी. TTE उपलब्ध नसेल तर 'Rail Madad App' वापरून...
भारतीय रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचीही विशेष काळजी घेते. अनेकदा ट्रेनमध्ये प्रवास करताना असं दिसतं की, तुम्ही आरक्षित केलेली सीट दुसऱ्या कोणीतरी बळकावललेली असते. अशा परिस्थितीत तुम्ही त्याला उठायला सांगितल्यास तो अनेक प्रकारची कारणं देतो. कधीकधी तो तुम्हाला दुसरी व्यवस्था करायलाही सुचवतो. अशा स्थितीत तुम्ही रेल्वेकडे तक्रार करून तुमची सीट रिकामी करून घेऊ शकता. ते कसं करायचं, सविस्तर पाहुया...
'रेल मदत' ॲपवर तक्रार नोंदवा
सर्वात आधी तुम्हाला टीटीईकडे तक्रार करावी लागेल. जर तुम्हाला टीटीई सापडला नाही, तर तुम्ही रेल्वे ॲपवर तक्रार करू शकता. किंवा असं करा... आधी तुम्हाला 'रेल मदत' ॲप डाउनलोड करावं लागेल. तुमच्या मोबाईल नंबरने "Send OTP" बटणावर क्लिक करा. मोबाईलवर आलेला ओटीपी आणि तुमचा पीएनआर नंबर टाका. त्यानंतर "Type" पर्यायावर क्लिक करून तुमच्या तक्रारीचा प्रकार निवडा. त्यानंतर घटनेची तारीख निवडा. यानंतर, तुमची तक्रार सविस्तर लिहा आणि "Submit" बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमची तक्रार रेल्वेपर्यंत पोहोचेल.
advertisement
ट्रेनमध्ये तुमची आरक्षित सीट दुसऱ्या कोणीतरी घेतली आहे... ही घटना खूप सामान्य आहे आणि अशा स्थितीत दोन्ही पक्षांमध्ये भांडण होतं. एक म्हणतो, 'माझी सीट'; दुसरा म्हणतो, 'मी उठणार नाही'... पण अनेकांना हे माहीत नसतं की, त्याला उतरवण्यासाठी एक सोपा मार्ग आहे.
139 वर तक्रार नोंदवा
रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे की, जर एखाद्या प्रवाशाची आरक्षित सीट किंवा बर्थ दुसऱ्या कोणीतरी बेकायदेशीरपणे बळकावला असेल, तर सर्वप्रथम संबंधित ट्रेनच्या टीटीईला माहिती द्यावी. जर तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकत नसाल, तर अशा परिस्थितीत तुम्ही रेल्वे हेल्पलाइन नंबर 139 वर कॉल करूनही तक्रार नोंदवू शकता.
advertisement
तिकीटाशिवाय प्रवास करणे गुन्हा आहे
तिकीटाशिवाय प्रवास करणे हा भारतीय रेल्वेमधील सर्वात सामान्य गुन्ह्यांपैकी एक आहे. जर कोणी तिकीटाशिवाय प्रवास करताना पकडला गेला, तर त्याला प्रवास केलेल्या अंतरावर अवलंबून तिकीटाच्या किंमतीसह 250 रुपये दंड भरावा लागेल. जर अटक केलेल्या व्यक्तीकडे पैसे नसतील किंवा त्याने दंड भरण्यास नकार दिला, तर त्याला आरपीएफकडे (रेल्वे संरक्षण दल) सुपूर्द केलं जाईल आणि त्याच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम 137 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. आरपीएफ या प्रवाशांना दंडाधिकाऱ्यासमोर हजर करेल, जिथे 1000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. दंड न भरल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.
advertisement
हे ही वाचा : फ्रिज ठेवलेले अन्नपदार्थ खाताय? मग लक्षात ठेवा 'या' गोष्टी, नाहीतर आरोग्याचं होईल मोठं नुकसान!
हे ही वाचा : डायबेटिसवर नियंत्रण ठेवणं झालं सोपं! रोज आहारात घ्या 'या' भाज्या, ब्लड शुगर राहील नियंत्रणात
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 20, 2025 12:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ट्रेनमध्ये तुमची आरक्षित सीट दुसऱ्याने बळकावलीय? लगेच करा 'हे' काम, मिनिटांत सीट रिकामी होईल!