advertisement

Kapil Sharma : कपिल शर्मा शोचे हे प्रसिद्ध चेहरे आज कुठे आहेत? 'या' 3 कलाकारांनी तर जगाला दिला निरोप

Last Updated:
काही कलाकारांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, काहींनी कपिलची साथ सोडली, तर काही कलाकारांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. आज आपण कपिलच्या शोमधील अशाच काही गाजलेल्या चेहऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
1/12
वीकेंडला रात्री सहकुटुंब टीव्हीसमोर बसून खळखळून हसणं, ही अनेक भारतीय घरांची परंपरा बनली आहे. या परंपरेच्या केंद्रस्थानी राहिला आहे तो म्हणजे सर्वांचा लाडका कपिल शर्मा. 2013 मध्ये जेव्हा कपिलने 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'चा पाया रचला, तेव्हा हा शो यशाची इतकी शिखरं सर करेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. आज कपिल टीव्हीवरून आता थेट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

2/12
पण या 12 वर्षांच्या प्रवासात कपिलच्या टीममधील अनेक चेहरे बदलले. काही कलाकारांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, काहींनी कपिलची साथ सोडली, तर काही कलाकारांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. आज आपण कपिलच्या शोमधील अशाच काही गाजलेल्या चेहऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

3/12
चंदन प्रभाकरकपिलचा जिवलग मित्र चंदन अनेक वर्षे या शोचा अविभाज्य भाग होता. 2018 मध्ये त्याने शो सोडला. गेल्या वर्षी तो 'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया'मध्ये दिसला होता.

4/12
सुगंधा मिश्राआपल्या आवाजाने आणि मिमिक्रीने सर्वांना घायाळ करणारी सुगंधा 2017 मध्ये शोमधून बाहेर पडली. त्यानंतर तिने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सारख्या शोमध्ये होस्ट म्हणून काम केले.

5/12
नसीम विक्कीपाकिस्तानचे प्रसिद्ध कलाकार नसीम विक्की सुरुवातीच्या काळात शोचा भाग होते. आता ते पाकिस्तानी मनोरंजन सृष्टीत मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत.

6/12
गौरव गेरा'दुलारी' ही व्यक्तिरेखा अजरामर करणारा गौरव अलीकडेच आदित्य धरच्या 'धुरंधर' या चित्रपटात झळकला होता.

7/12
विशाल सिंग'साथ निभाना साथिया' फेम विशाल याने शोमध्ये 'मँगो वऱ्हाडी'ची भूमिका केली होती. 2021 पासून तो अभिनयापासून दूर असला तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

8/12
सोनी सिंगकपिलच्या सेक्रेटरीची भूमिका करणारी सोनी अजूनही टीव्ही क्षेत्रात सक्रिय आहे. 2025 मध्ये ती 'मेघा बरसे' या शोमध्ये दिसली होती.

9/12
रोशनी चोप्राएकेकाळी कपिलच्या शोची जान असलेली रोशनी आता ग्लॅमरच्या जगापासून काहीशी दूर आहे. ती सोशल मीडियावर आपल्या लाईफस्टाईल अपडेट्स देत असते.

10/12
अतुल परचुरेमराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांनी कपिलच्या शोमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. दुर्दैवाने, 14ऑक्टोबर 2024 रोजी कॅन्सरशी झुंज देताना त्यांचे निधन झाले.

11/12
राजू श्रीवास्तव'कॉमेडी किंग' राजू श्रीवास्तव यांनी या शोमध्ये 'रोझी' नावाच्या ब्युटीशियनची भूमिका साकारली होती. 21 सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

12/12
रज्जाक खानआपल्या 'गोल्डन भाई' या भूमिकेने धुमाकूळ घालणारे रज्जाक खान 1 जून 2016 रोजी आपल्याला सोडून गेले.

EPFO New Rules: सरकारने PFवर दिली सर्वात मोठी अपडेट, क्लेम केल्यानंतर फक्त इतक्या दिवसात मिळणार पैसे
सरकारने PFवर दिली सर्वात मोठी अपडेट, क्लेम केल्यानंतर इतक्या दिवसात मिळणार पैसे
  • सरकारची मोठी घोषणा

  • नोकरी सोडली की 8 दिवसांत पैसा हातात

  • अशी आहे संपूर्ण प्रोसेस

View All
advertisement