Health Tips : WHO ओआरएस समजून तुम्ही ORSL फ्रूट ज्युस तर पित नाही ना? पाहा दोन्हींमध्ये काय फरक
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
हैद्राबादमध्ये ओआरएसच्या नावाने विकल्या जाणाऱ्या ओआरएसएल किंवा रेबेलेन्जेविट ओआरएसविरोधात बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवरंजिनी यांनी मोहीम राबवली. डॉक्टरांनी याचे नुकसानही सांगितले आहेत.
मुंबई : अतिसार झाल्यास लहान मुले असो की मोठी माणसं डॉक्टर प्रत्येकाला औषधापूर्वी डब्ल्यूएचओ ओआरएस घेण्याचा सल्ला देतात. जेणेकरून रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये. यामुळे बरेच लोक हल्ली डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमधून ORS खरेदी करतात आणि घेतात. पण तुम्ही अनेकदा सामान्य इलेक्टोरेट पावडर किंवा WHO-ऐवजी, फ्रूटी आणि रिअल फ्रूट ज्यूसच्या स्वरूपात येणारे ORSL किंवा Rebelenvit ORS खरेदी करता का? बरेचदा केमिस्ट तुम्हाला टेट्रा पॅकमध्ये फ्लेवर्ड ओआरएसएल देतात आणि ते चांगले असल्याने मुलं सहज घेतील असे म्हणतात.
असे म्हटल्यावर लोक बरेच पैसे खर्च करून सफरचंद किंवा संत्र्याचा फ्लेवर्ड ORS किंवा Rebelngevit ORS विकत घेत घेतात. मात्र हे चांगले नाही. त्यामुळे तुम्ही अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. टेट्रा पॅकमध्ये उपलब्ध असलेले हे ओआरएसएल तुम्हाला किंवा अतिसाराने ग्रस्त असलेल्या तुमच्या मुलांचे फायद्याऐवजी नुकसान करू शकते. हैदराबाद येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवरंजिनी संतोष यांचे हेच म्हणणे आहे.
advertisement
डॉ. शिवरंजिनी ओआरएसच्या नावाने विकल्या जाणाऱ्या ओआरएसएल सारख्या पेयांच्या विरोधात अनेक दिवसांपासून मोहीम राबवत आहेत आणि लोकांना जागरुक करत आहेत की तुम्ही जे पीत आहात ते डब्ल्यूएचओचे फॉर्मुला आहे पण हे ओरिजिनल नाही. याशिवाय त्यात साखरेचे प्रमाणही जास्त असते, जे मधुमेही किंवा प्री-डायबेटिक रुग्णांसाठी हानिकारक असते.
ORS आणि ORSAL मध्ये नेमका फरक काय?
डॉ. शिवरंजिनी म्हणतात की ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सॉल्ट किंवा सोल्युशन. त्यात सोडियम, पोटॅशियम, ग्लुकोज आणि पाणी यांचे मिश्रण असते. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मानकांनुसार कठोर संशोधन करून ते तयार केले आहे. हे सहसा अतिसार, उलट्या आणि शरीरात पाण्याची कमतरता असल्यास हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढण्यासाठी दिले जाते.
advertisement
त्याउलट ORSL किंवा Rebelgenvit ORS हा एक प्रकारचा फळांचा स्वाद असलेला रस आहे, जो इलेक्ट्रोलाइट पेय म्हणून विकला जात आहे. या प्रकारचे ज्यूस अनेक ब्रँड्समध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्ही त्याच्या बॉक्सवरील घटक बघितले तर तुम्हाला दिसेल की त्यात पाणी, जास्त साखर, सुक्रोज, डेक्सट्रोज, सफरचंद किंवा संत्र्याचा रस, ऍडेड फ्लेवर्स, कृत्रिम चव, सोडियम सायट्रेट, पोटॅशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड आणि व्हिटॅमिन सी इ. अनेकदा हे विकताना केमिस्ट सांगतात की, हे देखील ORS आहेत आणि मुलांसाठी चांगले आहे. कारण मुले ते ज्यूस असल्यासारखे पितात.
advertisement
यामुळे काय नुकसान होऊ शकते?
डॉ. शिवरंजिनी म्हणतात, हीच गोष्ट चुकीची आहे. अतिसाराचा त्रास असलेल्या कोणीही ORSL पिऊ नये. जुलाबाच्या वेळी हा गोड रस प्यायल्यास जुलाब बरा होण्याऐवजी वाढू शकतो. शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते. डायबिटीजच्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो. कारण त्यात सॅकरिन किंवा एस्पार्टेम सारखे हानिकारक पदार्थ स्वीटनर म्हणून असतात.
advertisement
डायरियामध्ये ORS घेणे का महत्त्वाचे आहे?
खूप संशोधन आणि अभ्यास करून WHO ORS फॉर्म्युला तयार केल्याचे डॉ. शिवरंजिनी सांगतात. त्यात ट्रायसोडियम सायट्रेट डिहायड्रेट, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड आणि निर्जल ग्लुकोज योग्य प्रमाणात असते. इतर पेयांमध्ये हे दिसत नाही. ओआरएसच्या नावाने विकल्या जाणाऱ्या इतर पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे डायरियामध्ये नेहमी WHO ORS फॉर्म्युलाच घ्यावा.
advertisement
इतर आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?
सीताराम भारतीय विज्ञान आणि संशोधन संस्था, दिल्लीचे ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. जितेंद्र नागपाल म्हणतात की, ORS च्या नावाने बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या टेट्रा पॅक्ड इलेक्ट्रोलाइट पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. पण ते हानिकारक आहे असे म्हणता येणार नाही. अतिसार झाल्यानंतर शरीराला रीहायड्रेट करण्यासाठी द्रवपदार्थात प्रवेश असणे खूप महत्वाचे आहे. अनेक कॅम्पमध्ये लोकांना सांगितले जाते की, ओआरएस पावडर उपलब्ध नसल्यास ताबडतोब ठराविक प्रमाणात मीठ आणि साखर पाण्यात विरघळवून ती अतिसाराच्या रुग्णाला द्यावी. मात्र हे पेय WHO ORS फॉर्म्युलापेक्षा महाग आहेत. म्हणूनच, केवळ अतिसाराच्या बाबतीत WHO च्या शिफारस केलेल्या फॉर्म्युल्याचे ORS घेणे चांगले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 14, 2024 12:05 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : WHO ओआरएस समजून तुम्ही ORSL फ्रूट ज्युस तर पित नाही ना? पाहा दोन्हींमध्ये काय फरक