शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी उपयोगी पडतील 'हे' सोपे घरगुती उपाय

Last Updated:

शुक्राणूंची कमतरता म्हणजे सेक्स करताना पुरुषाच्या लिंगातून बाहेर पडणाऱ्या वीर्यमध्ये सामान्यापेक्षा कमी शुक्राणू असतात.

शुक्राणू वाढवण्यासाठी घरगुती उपाय
शुक्राणू वाढवण्यासाठी घरगुती उपाय
मुंबई : निरोगी आयुष्यासाठी शारीरिक संबंध ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा स्त्री आई बनते तेव्हाच पती-पत्नीचं नातं पूर्ण मानलं जातं, परंतु काही बाबतीत असे होत नाही. ही कमतरता स्त्री किंवा पुरुष कोणामध्येही असू शकते.
पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता असल्यास तो वडिल होऊ शकत नाही. 'माय उपचार' शी संबंधित डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांच्या मते, शुक्राणूंची कमतरता म्हणजे सेक्स करताना पुरुषाच्या लिंगातून बाहेर पडणाऱ्या वीर्यमध्ये सामान्यापेक्षा कमी शुक्राणू असतात.
या स्थितीला वैद्यकीय भाषेत ऑलिगोस्पर्मिया म्हणतात. अशी परिस्थिती देखील उद्भवते जेव्हा शुक्राणू पूर्णपणे संपतात. याला अ‍ॅझोस्पर्मिया म्हणतात. एक मिलिलिटर वीर्यामध्ये 1.5 कोटी पर्यंत शुक्राणू असावेत. यापेक्षा कमी असल्यास उपचार करावे लागतात. शुक्राणू मोजण्यासाठी चाचण्या देखील केल्या जाऊ शकतात. शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, ज्याचा अवलंब कोणत्याही दुष्परिणामाशिवाय करता येतो.
advertisement
शुक्राणूंची संख्या कमी होण्याची लक्षणं
जेव्हा पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते तेव्हा शरीराकडून संकेत मिळू लागतात. लैंगिक क्रियांमध्ये समस्या, पुरुषाच्या जननेंद्रियात सूज, गाठ, चेहऱ्यावरील केस कमी होणे ही हॉर्मोन्सच्या असामान्य स्थितीची लक्षणं आहेत. डॉ.व्ही.के.राजलक्ष्मी यांच्यानुसार, एखाद्या पुरुषाने इच्छा नसल्यामुळे एक वर्ष शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच एक वर्ष शारीरिक संबंध ठेवूनही गर्भधारणा होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
advertisement
शुक्राणू वाढवण्यासाठी घरगुती उपाय
माय उपचारशी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्या मते, अश्वगंधा शुक्राणू वाढवण्यासाठी योग्य उपाय आहे. अर्धा चमचा अश्वगंधा पूड एक ग्लास दुधात मिसळून त्याचं नियमित सेवन करा. सुरुवातीला त्याचे दिवसातून दोनदा सेवन केलं तर चालेल.
advertisement
या शिवाय अश्वगंधा मुळाचा रस तयार करून प्यावा. माका मूळ ही आणखी एक लोकप्रिय औषधी वनस्पती आहे जी हॉर्मोन्स संतुलित करण्यासाठी कार्य करते. दिवसातून दोनदा माका मुळांचं सेवन करणं फायदेशीर आहे. हे पाणी किंवा प्रोटिन शेक सोबतदेखील घेता येतं.
शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी लसूण हा घरगुती उपायदेखील आहे. लसूण हे एक नैसर्गिक औषध आहे जे सेक्सची इच्छा वाढवतं. त्यात अ‍ॅलिसिन नावाचं संयुग असतं जे शुक्राणू वाढवतं. या शिवाय लसणात असलेले सेलेनियम शुक्राणूंची गतिशीलता सुधारण्यास मदत करतं.
advertisement
लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या रोज खाव्यात. शक्य असल्यास कच्चा लसूण खा, या शिवाय शुक्राणू वाढवण्यासाठी पॅनॅक्स जिनसेंग हे आयुर्वेदिक औषध आहे. याला कोरियन जिनसेंग असेही म्हणतात. चीनमध्ये याचा उपयोग तणाव दूर करण्यासाठी केला जातो.
शुक्राणू वाढवण्यासाठी आणखी एक घरगुती उपाय म्हणजे ग्रीन टी होय. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे शुक्राणूंच्या पेशींना होणारं नुकसान टाळतात. यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता आणि गतिशीलता वाढते. या शिवाय शुक्राणूंची कमतरता टाळण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. अधिक ऑरगॅनिक उत्पादनं वापरा, व्हिटॅमिन सी, झिंक, सेलेनियम, फॉलिक अ‍ॅसिड आणि ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड समृध्द अन्न घ्या व ताण घेऊ नका. तसंच पुरेशी झोप घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी उपयोगी पडतील 'हे' सोपे घरगुती उपाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement