गर्भातही होऊ शकतो बाळाला मोतीबिंदू? आईच्या काही चुकांमुळे जाऊ शकते दृष्टी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Childhood cataracts : डोळ्यांचा हा आजार साधारणतः वयाच्या 50 ते 60 वर्षांपासून सुरू होतो. मात्र आता लहान मुलांमध्येसुद्धा हा आजार पाहायला मिळतो. अनुवंशिकता हे यामागचं कारण असू शकतं. परंतु...
हीना आझमी, प्रतिनिधी
देहरादून : आपल्याला कधी ताप आला, सर्दी झाली, डोकं दुखलं, तर आपण मनाने किंवा कोणाच्यातरी सल्ल्याने एखादी गोळी घेतो आणि तात्पुरता आराम मिळतो. परंतु असं करणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. गरोदरपणात अशी औषधं घेणं तर जास्त धोक्याचं आहे. कारण याचा थेट परिणाम बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाचून आश्चर्य वाटेल, मात्र आईच्या गर्भातही बाळाला मोतीबिंदू होण्याची शक्यता असते.
advertisement
उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहरादूनमधील दून रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाचे डॉक्टर सुशील ओझा सांगतात, वाढत्या वयात मोतीबिंदू होणं सामान्य आहे. डोळ्यांचा हा आजार साधारणतः वयाच्या 50 ते 60 वर्षांपासून सुरू होतो. मात्र आता लहान मुलांमध्येसुद्धा हा आजार पाहायला मिळतो. अनुवंशिकता हे यामागचं कारण असू शकतं. परंतु इतरही काही कारणांमुळे बाळांना या आजाराचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नये!
डॉ. सुशील ओझा सांगतात, गरोदरपणाच्या सुरूवातीच्या काळात ताप येऊ शकतो, साथीचे आजार होऊ शकतात. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नये. चुकीची औषधं घेतल्यास बाळाच्या डोळ्यांवर प्रभाव पडू शकतो. बाळाच्या डोळ्यावर वाईट परिणाम झाला तर त्याला मोतीबिंदूसुद्धा होऊ शकतं किंवा त्याच्या डोळ्यांचा योग्य विकास होत नाही.
advertisement
कमी वयात येऊ शकतं अंधत्त्व!
जर पोटात असताना बाळाचा योग्य विकास झाला नाही, तर त्याला पुढे त्रास होऊ शकतो. अर्थात डोळ्यांचा योग्य विकास न झाल्यास वाढत्या वयात अंधत्त्व येऊ शकतं. त्यामुळे आईने गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याने सकस आहार घ्यावा आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधं वेळच्या वेळी घ्यावी.
Location :
Dehradun,Uttarakhand
First Published :
August 15, 2024 7:36 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
गर्भातही होऊ शकतो बाळाला मोतीबिंदू? आईच्या काही चुकांमुळे जाऊ शकते दृष्टी