गरोदरपणात करावी 'ही' योगासनं, नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
शरिराला व्यायाम हवाच. गरोदरपणातही काही विशेष व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे महिलांचं शरीर फिट राहतं.
पीयूष शर्मा, प्रतिनिधी
मुरादाबाद : खाण्या-पिण्यातले बदल, हवेतलं वाढतं प्रदूषण, कामाचा व्याप, स्पर्धात्मक जग, वाढता ताण, इत्यादींमुळे आजकाल आपलं शरीर पूर्वीच्या लोकांसारखं भक्कम राहिलेलं नाही. पूर्वी जे आजार साठीत जडायचे ते आता अगदी विशीत जडू लागले आहेत. आपल्यातली नाजूकता आता प्रचंड वाढलीये.
पूर्वीच्या काळात गरोदर महिलेची प्रसूती म्हणजेच डिलिव्हरी नॉर्मल पद्धतीने घरच्या घरीच केली जायची. त्यानंतर डिलिव्हरीच्या काही तासांपूर्वी, मग काही दिवसांआधी महिलांना रुग्णालयात दाखल केलं जाऊ लागलं. आता तर अनेक महिलांची सिजेरियन पद्धतीनं डिलिव्हरी होते. अनेक महिला नॉर्मल पद्धतीनं डिलिव्हरी व्हावी यासाठी गरोदरपणात काय काळजी घ्यावी, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतात.
advertisement
शरिराला व्यायाम हवाच. गरोदरपणातही काही विशेष व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. योगाचार्य मनीष गर्ग सांगतात की, गरोदरपणासाठी काही अशी खास योगासनं आहे, जी केल्यानं नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढते. मनीष यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता घरातली अनेक कामं उभ्याने केली जातात. पूर्वी महिला खाली बसून अनेक कामं करायच्या, ज्यामुळे शरिराचा व्यायाम व्हायचा. परंतु आता उभ्यानेच सगळी कामं केल्यानं शरिराची हवी तशी हालचाल होत नाही. परिणामी नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा सिजेरियन जास्त होतात.
advertisement
मनीष यांनी पुढे सांगितलं की, तितली आसन, मलासन, सेतू बांध आसन, मत्स्यासन, बद्ध कोणासन, त्रिकोणासन, गतिकोणासन, यंग आसन, बिलाव आसन, इत्यादी आसनं गरोदरपणात उपयुक्त ठरतात. या आसनांनी महिलांचं शरीर फिट राहतं. त्याचबरोबर गरोदरपणात जमतील तशी घरातली कामंही करावी, असं मनीष यांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरीही आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Moradabad,Uttar Pradesh
First Published :
June 07, 2024 3:41 PM IST