Pregnancy Tips: बदलत्या जीवनशैलीचा फटका, गर्भावस्थेत ‘हायपरटेन्शन’चा धोका, कशी घ्यावी काळजी?

Last Updated:

Pregnancy Tips: बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये हायपरटेन्शनचा धोका वाढला आहे. गर्भावस्थेत योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

+
Pregnancy

Pregnancy Tips: बदलत्या जीवनशैलीचा फटका, गर्भावस्थेत ‘हायपरटेन्शन’चा धोका, कशी घ्यावी काळजी?

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : बदलती जीवनशैली, आहारातील बदल आणि धावपळीचे जीवन यामुळे गर्भवती महिलांमध्ये गर्भावस्थेत गुंतागुंत निर्माण होण्याची भीती वाढत आहे. गेल्या दहा वर्षांपासून गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्तदाबाची (हायपरटेन्शन) समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. तज्ज्ञांच्या मते, सुमारे 5 टक्के गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळून येत असून, यामुळे प्री-एक्लमप्शिया ही गंभीर अवस्था निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे. यासंदर्भात कोल्हापुरातील डॉ. अविनाश शिंदे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
गर्भावस्था हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सुखद अनुभव असतो. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे या आनंदात अनेक समस्या निर्माण होत आहेत. गर्भवती महिलांमध्ये रक्तदाब वाढणे, हात-पायांना सूज येणे, मूत्रात प्रोटीन जमा होणे, बाळाची वाढ खुंटणे किंवा गर्भात बाळाचा मृत्यू होणे अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. यालाच वैद्यकीय भाषेत प्री-एक्लमप्शिया असे म्हणतात.
डॉ. शिंदे यांच्या मते, रक्तदाब वाढणे हे प्री-एक्लमप्शियाचे पहिले लक्षण असू शकते. त्यामुळे वेळीच निदान आणि उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी नियमित वैद्यकीय चाचण्या, बाळाच्या हालचालींचे निरीक्षण, सोनोग्राफी आणि डॉपलर तपासण्या महत्त्वाच्या आहेत. जर माता किंवा बाळाला धोका असल्याचे आढळले, तर नियोजित प्रसूती करावी लागते. यामुळे अनेकदा प्री-एक्लमप्शिया असलेल्या मातांची पूर्ण मुदत भरण्यापूर्वीच प्रसूती केली जाते.
advertisement
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात 30 ते 79 वयोगटातील सुमारे 1.28 अब्ज लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. विशेष म्हणजे, यापैकी निम्म्याहून अधिक लोकांना याची जाणीवच नसते. यंदाच्या 2025 च्या जागतिक उच्च रक्तदाब दिनाची थीम आहे, "तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, तो नियंत्रित करा, दीर्घायुषी व्हा." वर्ल्ड हायपरटेन्शन लीगने 2005 मध्ये प्रथमच हा दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
advertisement
उच्च रक्तदाबाची लक्षणे आणि धोके
उच्च रक्तदाबाची लक्षणे अनेकदा गंभीर अवस्थेतच दिसून येतात. यामध्ये वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, धूसर किंवा दुहेरी दृष्टी, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, नाकातून रक्त येणे, थकवा किंवा गोंधळ यांचा समावेश होतो. मात्र, अनेकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे नियमित रक्तदाब तपासणी हा सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे.
advertisement
प्रतिबंध आणि उपाय
उच्च रक्तदाब हा जीवनशैलीशी निगडित आजार आहे. तणावमुक्त आणि संतुलित जीवनशैली स्वीकारणे हा पहिला उपाय आहे. आहारात तेलकट, फॅटयुक्त, जंक फूड आणि जास्त मीठ टाळावे. नियमित व्यायाम, औषधोपचार आणि आहार नियंत्रण यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. डॉ. शिंदे यांनी सांगितले की, "जीवनशैलीतील बदल आणि औषधोपचार हीच उच्च रक्तदाबावरील उपचारांची द्विसूत्री आहे."
advertisement
गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित तपासण्या आणि तज्ज्ञांचा सल्ला यामुळे माता आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित ठेवता येऊ शकते.
मराठी बातम्या/हेल्थ/
Pregnancy Tips: बदलत्या जीवनशैलीचा फटका, गर्भावस्थेत ‘हायपरटेन्शन’चा धोका, कशी घ्यावी काळजी?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement