advertisement

Health Care: महिला की पुरुष, हार्टअटॅकचा जास्त धोका कुणाला? Video पाहून धक्का बसेल!

Last Updated:

Heart Care: सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैली आणि इतर कारणांनी हृदयविकाराचा धोका वाढला आहे. स्त्रियांपेक्षा पुरषांना हा धोका अधिक असतो, याबाबत डॉक्टरांनी माहिती दिलीये.

+
Health

Health Care: महिला की पुरुष, कुणाला हार्ट अटॅकचा जास्त धोका, Video पाहून धक्का बसेल!

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: बदलत्या जीवनशैलीमुळे सध्याच्या काळात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. बऱ्याचजणांन हृदयविकाराच्या समस्यांना देखील सामोरं जावं लागतंय. हार्टअटॅक येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. परंतु, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण कमी आहे. याचं नेमकं कारण काय आहे? याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. गणेश सपकाळ यांनी माहिती दिलीये.
पुरुषांना हृदयविकाराचा धोका
सध्या पुरुषांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पुरुषांचा तुलनेमध्ये महिलांमध्ये हे प्रमाण कमी आहे. याची विविध कारणे आहेत. पण यातलं सर्वात महत्त्वाचं कारण ताण-तणाव म्हणजेच टेन्शन आहे. टेन्शनमुळे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेला आहे. पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असतं. यामध्ये हार्मोन्सचा प्रभाव तसंच दैनंदिन जीवनशैली कारणीभूत असते. शारीरिक जडण घडण, काही अनुवंशिक घटक, व्यसन या कारणांनी पुरुषांना धोक अधिक असतो, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
स्त्रियांना का कमी असतो धोका?
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. याला दोघांमधील जीवनशैलीत असणारा फरक हे एक कारण आहे. रजोनिवृत्तीपूर्वी महिलांमध्ये इस्ट्रोजन हार्मोनचे प्रमाण  अधिक असते. त्यामुळे स्त्रियांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी असतो. मात्र, रजोनिवृत्तीनंतर स्त्रिया आणि पुरुषांना हृदयविकाराचा धोका समान असतो, असे डॉक्टर सांगतात.
advertisement
अशी घ्या काळजी
हृदयविकार टाळण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहार याची काळजी घेणे गरजेचे असते. ताण-तणाव कमी राहिल्यास आजार जवळ येत नाहीत. धुम्रपान आणि इतर व्यवसनांपासून दूर राहावं. त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकारांचा धोका टाळता येतो, असेही डॉक्टर सांगतात.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Care: महिला की पुरुष, हार्टअटॅकचा जास्त धोका कुणाला? Video पाहून धक्का बसेल!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement