बारीक होण्यासाठी सर्वकाही केलं? हळदीचा उपाय केला का? त्याने चरबी पार वितळू शकते!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हळदीचा वापर शुगल लेव्हल आणि पोटातली चरबी कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. दररोज हळदीचं सेवन केल्यास चरबी वितळून कमी होऊ शकते.
लखेश्वर यादव, प्रतिनिधी
जांजगीर चांपा : हळद जवळपास प्रत्येक किचनमध्ये असते. तसं पाहिलं तर आपल्या किचनमधले सर्व मसाले औषधी गुणांनी परिपूर्ण असतात. परंतु हळदीला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. लहानशी जखम झाली तरी आपण त्यावर हळद लावतो. शिवाय हळद घातलेलं दूध प्यायल्यास झोप शांत लागते. असे हळदीचे अनेक उपयोग आहेत.
डॉक्टर फणींद्र भूषण दीवान सांगतात, आपण विविध प्रकारे हळदीचा वापर करू शकता. सर्दी, खोकला, इत्यादी साथीचे आजार हळदीमुळे बरे होऊ शकतात. शिवाय त्वचेवरही हळद गुणकारी असते. यात अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. ज्यामुळे जखम लवकर भरून निघते आणि त्वचा उजळते.
advertisement
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हळदीचा वापर शुगल लेव्हल आणि पोटातली चरबी कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. दररोज हळदीचं सेवन केल्यास चरबी वितळून कमी होऊ शकते, परिणामी वजनही कमी होण्यास मदत मिळते. जवळपास दररोज जेवणात हळदीचा वापर केला जातो, त्यामुळे ती नियमितपणे शरिरात जातेच. आपण जेवणात हळद वापरत नसाल, तर आता सुरूवात करायला हरकत नाही.
advertisement
अगदी लहान-लहान आजारांपासून मोठ-मोठे आजार हळदीमुळे दूर होऊ शकतात. शरिरावर कुठे सूज आली असेल तर त्यावर हळदीचा लेप लावल्यानं आराम मिळतो. हळूहळू सूज ओसरते. चहा किंवा गरम पाण्याची वाफ त्वचेवर आली आणि पोळलं, तर त्यावरसुद्धा हळदीची पावडर लावल्यास आराम मिळू शकतो. दरम्यान, हळदीला धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. दृष्ट काढण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Janjgir-Champa,Chhattisgarh
First Published :
August 02, 2024 12:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
बारीक होण्यासाठी सर्वकाही केलं? हळदीचा उपाय केला का? त्याने चरबी पार वितळू शकते!