दिवसभरात दूध नेमकं कधी प्यावं? चुकीच्या वेळी प्यायल्यास बिघडू शकतं पोट
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
दुधातून शरिराला भरपूर पोषक तत्त्व मिळतात. यात भरपूर प्रोटिन्स आणि कॅल्शियम असतात.
मनमोहन सेजू, प्रतिनिधी
बाडमेर : अनेकजण दररोज दूध पितात. दुधातून शरिराला भरपूर पोषक तत्त्व मिळतात. मात्र ब्रेकफास्ट, लंच की डिनर, दूध पिण्यासाठी सर्वात चांगली वेळ कोणती माहितीये? याबाबत डॉ. पंकज अग्रवाल यांनी माहिती दिली आहे.
डॉक्टरांनी सांगितलं, ब्रेकफास्टनंतर दूध प्यायल्यास शरीर ऊर्जावान राहतं. दुधात भरपूर प्रोटिन्स आणि कॅल्शियम असतात. ज्यामुळे सकाळी मेटाबॉलिज्म वाढतं. तसंच सकाळी दूध प्यायल्यानं पोट सुदृढ राहतं.
advertisement
तर, लंचनंतर दूध प्यायल्यास पचनक्रिया मंदावते. दूध जड असल्यानं ते पचायला वेळ लागतो. दुपारच्या वेळी ते प्यायल्यास सुस्ती येते. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणं अवघड होतं. तसंच काहीजणांना सकाळी दूध प्यायल्यानंही त्रास होऊ शकतो. पोटदुखी, गॅस किंवा अपचनाचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
डॉक्टर सांगतात की, डिनरनंतर दूध पिणं सर्वोत्तम. त्यामुळे झोप चांगली लागते आणि शरिराला आराम मिळतो. रात्री ग्लासभर दूध गरम करून पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
Location :
Barmer,Rajasthan
First Published :
August 01, 2024 7:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
दिवसभरात दूध नेमकं कधी प्यावं? चुकीच्या वेळी प्यायल्यास बिघडू शकतं पोट