Free Healthcare: खरा देवदूत, 26 वर्षांपासून करतोय काम, 3 लाख गरजूंना मोफत आरोग्यसेवेचा लाभ, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
गेल्या 26 वर्षांपासून ग्रामीण आणि झोपडपट्टी भागात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत. या शिबिरांत सर्वसमावेशक आरोग्य तपासणीसोबतच गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार, लसीकरण आणि शस्त्रक्रियांची सुविधा पुरवली जाते.
पुणे : आपल्या भारतीय संस्कृतीत डॉक्टरांना देवदूत मानले जाते आणि पुण्यातील डॉ. प्रकाश सहिंद्रकर हे याच भावनेला न्याय देत आहेत. गेल्या 26 वर्षांपासून ग्रामीण आणि झोपडपट्टी भागात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत. या शिबिरांत सर्वसमावेशक आरोग्य तपासणीसोबतच गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार, लसीकरण आणि शस्त्रक्रियांची सुविधा पुरवली जाते. त्यामुळे ग्रामीण आणि झोपडपट्टी भागातील कष्टकरी वर्गाला मोफत आरोग्यसेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे.
ट्रस्टची स्थापना आणि कार्य
वडिलांचा समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी 2007 साली कै. डॉ. भाऊसाहेब सहिंद्रकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ट्रस्टच्या माध्यमातून आजवर आयोजित हजारो आरोग्य शिबिरांतून तीन लाखांहून अधिक गरजूंना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळाला आहे.
मोफत तपासण्या आणि उपचार
शिबिरांमध्ये नेत्र, नाक, कान, घसा, स्त्रीरोग, त्वचारोग, बालरोग, दंतरोग, मूळव्याध, रक्तदाब, ईसीजी, बोन डेन्सिटी यांसारख्या तपासण्या केल्या जातात. मोफत चष्मे वाटप, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, विविध आजारांवरील लसीकरण तसेच एचआयव्ही जनजागृती मोहिमा राबवल्या जातात.
advertisement
वारकऱ्यांसाठी सेवा
दरवर्षी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पुण्यात मुक्कामी आलेल्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराची सोय केली जाते. तसेच मूकबधिर, अनाथ, अपंग, गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या संस्थांना धान्य, कपडे, पुस्तके आणि आर्थिक मदत पुरवली जाते. अपंग मुलांना दत्तक पालकत्वही दिले जाते.
विधवा महिलांसाठी धान्य किट्स
view commentsगेल्या 6 वर्षांपासून ट्रस्टतर्फे प्रत्येक महिन्याच्या 5तारखेला गरजू विधवा महिलांना धान्याचे किट्स दिले जातात. तसेच आर्थिक अडचण असलेल्या विद्यार्थ्यांची फी भरून त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत केली जाते. समाजासाठी नि:स्वार्थी सेवा देणाऱ्या डॉ. प्रकाश सहिंद्रकर यांना ग्रामीण आणि झोपडपट्टीतील आरोग्यसेवेबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 13, 2025 5:08 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Free Healthcare: खरा देवदूत, 26 वर्षांपासून करतोय काम, 3 लाख गरजूंना मोफत आरोग्यसेवेचा लाभ, Video

