advertisement

उष्णतेमुळे उन्हाळी लागलीय? बकरीचं दुध आहे जालिम उपाय, पाहा आरोग्यदायी फायदे

Last Updated:

तापमान वाढताच अनेकांना उन्हाळी लागण्याची समस्या पाहायला मिळते. उन्हाळीपासून सुटका करण्यासाठी बकरीचे दूध हे एक उत्तम उपाय आहे.

+
बकरीचे

बकरीचे दुध

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : राज्यात सगळीकडेच उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत देखील पोहोचले आहे. तापमान वाढताच अनेकांना उन्हाळी लागण्याची समस्या पाहायला मिळते. उन्हाळीपासून सुटका करण्यासाठी बकरीचे दूध हे एक उत्तम उपाय आहे. ग्रामीण भागामध्ये आजही अनेक जण बकरीच्या दुधाचा वापर हा उन्हाळी वर जालीम उपाय म्हणून करतात. पाहुयात कशा पद्धतीने बकरीच्या दुधाचा वापर करून आपण उन्हाळी पासून मुक्तता मिळवू शकतो.
advertisement
बकरीचे दूध हे आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय उत्तम असतं. बकरीही रानमाळावर, शेताच्या बांधावर, ओढ्याच्या काठाला चरत असल्याने ती विविध प्रकारच्या औषधी वनस्पती खात असते. त्यामुळे बकरीच्या दुधामध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे बकरीच्या दुधाचा चहा देखील आपल्या आरोग्याला चांगला असतो. तर उन्हाळ्यामध्ये अनेकांना ऊन लागण्याची तसेच उन्हाळी लागण्याची समस्या पाहायला मिळते यावर बकरीचे दूध हा परिणामकारक उपाय आहे.
advertisement
उन्हाळ्यात लेकरांना ऊन लागलं तर बकरीचं हातोहात काढलेलं दूध तळपायांना, तळहातांना लावायचे. तसेच एक किंवा दोन थेंब कानामध्ये टाकायचे. लहान बाळाच्या टाळूवर दुधाचे दोन तीन थेंब लावायचे याने उन्हाळीच्या त्रासापासून तत्काळ मुक्तता मिळते. हा उपाय केवळ लहान बाळांसाठीच नव्हे तर सर्व वयोगटांच्या महिला आणि पुरुषांसाठी उपयुक्त ठरतो. बकरीचे दूध तळपाय, तळहाताने लावल्यानंतर हातांना, पायांना थंडावा मिळतो. तसेच शरीरातील उष्णता कमी होऊन उन्हाळीच्या त्रासापासून सुटका मिळण्यास मदत होते. साधारणपणे 15 ते 20 मिनिटांमध्ये उन्हाळी लागलेल्या व्यक्तीला बकरीच्या दुधाने परिणाम जाणवतो, असं जाणकार विठ्ठल काळे यांनी सांगितलं.
advertisement
आम्ही हा उपाय आमच्या आजोबा पणजोबापासून उपयोगात आणत आहे. आजही ग्रामीण भागामध्ये ऊन लागल्यानंतर बकरीच्या दुधाचा वापर केला जातो. अनेकांना याबाबत माहिती नाही मात्र ज्यांना माहिती आहे ते बकरीच्या दुधाचा वापर अवश्य करतात, असं देखील काळे यांनी सांगितलं. तेव्हा तुम्हाला देखील कधी उन्हाळीचा किंवा उष्णतेचा त्रास झाला तर बकरीच्या दुधाचा वापर आवश्य करून बघा.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उष्णतेमुळे उन्हाळी लागलीय? बकरीचं दुध आहे जालिम उपाय, पाहा आरोग्यदायी फायदे
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement