Turmeric Water: रोज सकाळी प्या हळदीचे पाणी, फायदे पाहाल तर आवाक व्हाल!

Last Updated:

Turmeric Benefits: आयुर्वेदात हळद ही अत्यंत आरोग्यदायी मानली जाते. रोज सकाळी हळदीचं पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.

+
कॅन्सरच

कॅन्सरच नव्हे तर कोणताच आजार होणार नाही, रोज सकाळी प्या हळदीचं पाणी, Video

छत्रपती संभाजीनगर : हळद आपल्या आरोग्यासाठी अत्यंत असं फायदेशीर असते. यामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक आपल्या शरीराला मिळत असतात. पण जर रोज सकाळी उपाशीपोटी हळदीचं पाणी पिलं तर त्याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला होतात. याच फायद्यांबाबत छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती दिलाये.
आपल्याकडे हळद ही एक मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरली जाते. पण हीच हळद आयुर्वेदात अत्यंत गुणकारी मानली जाते. अनेक आजारांवरती ती फायदेशीर ठरते. हळदीमध्ये कर्क्यूमिन ऑईल हे फायटो केमिकल्स असतात. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. आपलं आरोग्य संवर्धनासाठी कर्क्यूमिन फायदा होतो. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर हळदीचे पाणी पिलं तर आरोग्यास अत्यंत फायद्याचं ठरतं. कॅन्सरसारखा आजार रोखण्याची ताकद त्यात असते, असं मंजू मठाळकर सांगतात.
advertisement
हळदीसोबत काळी मिरी
हळदी आपल्या सौंदर्यासाठी देखील फायदेशीर ठरते. आपण जर रोज सकाळी हळदीचे पाणी घेतलं तर आपली त्वचा देखील यामुळे चांगली होते. जर तुम्ही हळदीचे पाणी घेत असाल तर त्यात थोडीशी मिरी पावडर टाकल्यास त्याचा दुहेरी फायदा होता. त्यासाठी सकाळी गरम पाणी करून त्यात हळद टाकायची. तसेच यामध्ये चिमुटभर मिरे पावडर टाकून ते पाणी प्यायचं. याचा खूप फायदा होतो, असंही मंठाळकर सांगतात.
advertisement
दरम्यान, अनेक शारीरिक समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर वर्षानुवर्षे केला जातोय. वजन कमी करण्यासाठीही हळद फायदेशीर आहे. हळदीत अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, जे वजन कमी करण्यासाठी देखील अत्यंत प्रभावी आहेत, असंही आहारतज्ज्ञ सांगतात.
मराठी बातम्या/हेल्थ/
Turmeric Water: रोज सकाळी प्या हळदीचे पाणी, फायदे पाहाल तर आवाक व्हाल!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement