advertisement

एका दिवसात किती तास व्यायाम करावा? 'इतका' वेळ व्यायाम करणं चुकीचं, तज्ज्ञ सांगतात...

Last Updated:

सध्याच्या काळात फिटनेससाठी जिमला जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. मात्र, जास्त वेळ व्यायाम करणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. फिटनेस तज्ज्ञांच्या मते, सामान्य लोकांसाठी दिवसाला 45 ते 90 मिनिटांचा... 

Effects of over-exercising
Effects of over-exercising
आजकाल जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. जिममध्ये सर्व वयोगटातील लोक व्यायाम करताना दिसतात. जिममध्ये जाऊन लोकांना वाटतं की, जितका जास्त वेळ व्यायाम करू, तितका जास्त फायदा शरीराला मिळेल. पण, फिटनेस तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जिममध्ये ठराविक वेळेसाठीच व्यायाम करावा. जास्त व्यायाम करणं आरोग्यासाठी चांगलं नाही आणि त्यामुळे अनेक समस्याही उद्भवू शकतात. आता प्रश्न असा आहे की, लोकांनी दिवसातून किती तास व्यायाम करावा?
फक्त इतका वेळ जिममध्ये घालवावा
नोएडा येथील फिटनेस फोर्टियर अकादमीचे प्रशिक्षक देव सिंग यांनी न्यूज18 ला सांगितलं की, जिममध्ये व्यायाम करताना सर्वात सामान्य प्रश्न असतो की, दिवसातून जिममध्ये किती तास घालवावेत. प्रत्येक व्यक्तीचं फिटनेस ध्येय आणि शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. तुम्ही फक्त फिटनेस राखण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करत असाल, तर दिवसातून 45 मिनिटं ते 1.5 तास व्यायाम पुरेसा आहे. आठवड्यातून 3 ते 5 दिवस अशा प्रकारचा व्यायाम केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. मात्र, बॉडीबिल्डिंग करणाऱ्यांसाठी कालावधी थोडा जास्त असू शकतो.
advertisement
...अन्यथा शारीरिक व्याधी निर्माण होतात
फिटनेस प्रशिक्षकांनी सांगितलं की, तुम्ही जिममध्ये नवीन असाल, तर सुरुवातीला व्यायामाचा कालावधी कमी ठेवा. सुरुवातीला 2 ते 3 दिवसांत 30 ते 45 मिनिटं व्यायाम करणं योग्य मानलं जातं. जसं तुमचं शरीर व्यायामासाठी तयार होतं, तसं तुम्ही हळूहळू वेळ आणि तीव्रता वाढवू शकता. तयारीशिवाय जास्त व्यायाम करणं टाळावं, कारण त्यामुळे शरीरात थकवा आणि दुखापतीचा धोका वाढू शकतो. जास्त व्यायाम करणं एक गंभीर समस्या असू शकते. जेव्हा तुम्ही विश्रांती न घेता जास्त वेळ व्यायाम करता, तेव्हा थकवा, स्नायू दुखणं आणि संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
advertisement
आठवड्यातून फक्त 4-5 दिवस व्यायाम करणं योग्य
तज्ज्ञांच्या मते, जास्त व्यायाम केल्यानं शरीराची रोगप्रतिकारशक्तीही कमजोर होऊ शकते. म्हणून, व्यायाम करताना शरीराला योग्य विश्रांती मिळणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून स्नायू आणि शरीराचे इतर भाग योग्य प्रकारे काम करू शकतील. व्यायामाचं यश तुम्ही किती सातत्यानं आणि संतुलित पद्धतीनं व्यायाम करता यावर अवलंबून असतं. चांगल्या व्यायाम दिनचर्येत कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि लवचिकता व्यायामांचा समावेश असावा. आठवड्यातून 4 ते 5 दिवस एक तासाचा व्यायाम हा सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे. शरीराच्या गरजेनुसार व्यायामाचा कालावधी ठरवला जातो.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
एका दिवसात किती तास व्यायाम करावा? 'इतका' वेळ व्यायाम करणं चुकीचं, तज्ज्ञ सांगतात...
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement