Khobryache Laddu Recipe: रक्षाबंधनला भावाला गोड खाऊ घालायचे? झटपट बनवा खोबऱ्याचे लाडू, रेसिपीचा Video

Last Updated:

राखी पौर्णिमेला आपण भावाला राखी बांधतो, त्यानंतर काहीतरी छान गोड खाऊ घालतो. तर तुम्ही विकत कुठलाही गोड पदार्थ आणण्याऐवजी तुमच्या भावाला स्वतःच्या हाताने तयार केलेला, अगदी झटपट होणारी रेसिपी तयार करून देऊ शकता.

+
रक्षाबंधनला

रक्षाबंधनला भावाला गोड खाऊ घालायचे तर ही  डिश नक्की ट्राय करा

छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाचा आनंदाचा सण. राखी पौर्णिमेला आपण भावाला राखी बांधतो, त्यानंतर काहीतरी छान गोड खाऊ घालतो. तर तुम्ही विकत कुठलाही गोड पदार्थ आणण्याऐवजी तुमच्या भावाला स्वतःच्या हाताने तयार केलेला, अगदी झटपट होणारी रेसिपी तयार करून देऊ शकता. तर आज आपण बघणार आहोत की राखी पौर्णिमेसाठी खास खोबऱ्याचे लाडू कसे करायचे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. ऋतुजा पाटील यांनी याची रेसिपी सांगितली आहे.
लाडूसाठी लागणारे साहित्य
एक वाटी डेसिकेटेड कोकोनट, अर्धा वाटी दूध, अर्धा वाटी मिल्क पावडर, दोन चमचे साजूक तूप, साखर (चवीनुसार), वेलची पूड, केसर आणि थोडेसे मनुके एवढे साहित्य यासाठी लागेल.
लाडू करण्याची कृती
सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकायचा आणि हे मिश्रण गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये तुमच्या चवीनुसार साखर टाकावी. साखर एकजीव करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी मिल्क पावडर टाकायचं. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची.
advertisement
मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मिश्रण तयार झाल्यानंतर ते थोडंसं थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं. मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडूचा आकार देऊ शकता. लाडू बांधून घेतल्यानंतर तयार केलेल्या लाडूला वरतून खोबऱ्याचं कोटिंग करून घ्यायचं. आणि सगळे अशाच पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचे. लाडू तयार झाल्यानंतर त्यावरती तुम्ही मनुका ठेवू शकता किंवा तुमच्या आवडते कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता.
advertisement
तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी साहित्यामध्ये हे लाडू बनवून तयार होतात. तर या रक्षाबंधनला नक्की तुम्ही हे लाडू घरी ट्राय करा, तुमच्या भावाला नक्कीच आवडतील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Khobryache Laddu Recipe: रक्षाबंधनला भावाला गोड खाऊ घालायचे? झटपट बनवा खोबऱ्याचे लाडू, रेसिपीचा Video
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement