advertisement

उन्हाळ्यात त्वचा कोरडी अन् रखरखीत होण्याचा त्रास, अशी घ्या काळजी, राहील टवटवीत

Last Updated:

उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडणे, रखरखीत होणे, घाम येणे यासारख्या समस्या जाणवायला लागतात. परंतु आपल्या त्वचेची योग्य काळजी घेऊन आपण आपली त्वचा ताजी टवटवीत ठेवू शकतो.

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : मार्च महिन्यामध्ये उष्णता चांगलीच जाणवायला सुरुवात झाली आहे. ऊन वाढताच आपल्या त्वचेवर वाढत्या उष्णतेचा परिणाम जाणवायला सुरुवात होते. त्वचा कोरडी पडणे, रखरखीत होणे, घाम येणे यासारख्या समस्या जाणवायला लागतात. परंतु आपल्या त्वचेची योग्य काळजी घेऊन आपण आपली त्वचा ताजी टवटवीत ठेवू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेत आपली त्वचा ताजी, टवटवीत आणि प्रसन्न कशी ठेवावी? याबद्दलचं स्किन केअर स्पेशालिस्ट डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
उन्हाळा सध्या भरपूर प्रमाणात वाढला आहे. तापमान खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे आपल्या त्वचेला हानी पोहोचते. हे टाळण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची आपण या प्रकारे काळजी घेऊ शकतो.
उन्हाळ्यामध्ये केवळ दोनच वेळा जेंटल फेस वॉशने चेहरा धुवायचा आहे. फेस वॉशचा वापर दिवसातून केवळ दोनच वेळा करायचा असून वारंवार फेस वॉशचा वापर टाळायचा आहे. खूप घाम आल्यास किंवा या व्यतिरिक्त चेहरा धुवायचा असेल तर फक्त साध्या पाण्याने चेहरा धुवावा. खूप जास्त प्रमाणात एक्सप्लोअटिंग फेस वॉश वापरणे टाळायचे आहे. फेसवॉश केल्यानंतर जेंटल मॉइश्चरायझर वापरायचं आहे. मॉइश्चरायझर ही शक्यतो ऑइल कंट्रोल मॉइश्चरायझर या कॅटेगरीतला असावा. उन्हाळ्यामध्ये सन स्क्रीनचा देखील चांगला उपयोग होतो. दर तीन तासांनी आपल्या चेहऱ्यावर सन स्क्रीन लावणं आवश्यक आहे, असं डॉक्टर अमृता कुलकर्णी सांगतात.
advertisement
त्याचबरोबर आपण घरात असो किंवा बाहेर जात असून सन स्क्रीनचा वापर करणे अत्यंत गरजेचं आहे. सनस्क्रीन ही जेल बेस असावं. ज्यांना भरपूर प्रमाणात घाम येत असेल किंवा तेलकट त्वचा असेल तर त्यांनी वॉटरप्रूफ सन स्क्रीन वापरावं. त्याचबरोबर आपलं शरीर हायड्रेट राहण्यासाठी आपण भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. तसेच फळे खायला हवीत. फळांचा रस घ्यायला हवा. यामुळे आपली त्वचा उन्हाळ्यातही ताजीतवानी आणि टवटवीत दिसण्यास मदत होईल, असंही डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी सांगितलं.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात त्वचा कोरडी अन् रखरखीत होण्याचा त्रास, अशी घ्या काळजी, राहील टवटवीत
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement