Mental Health: आपला स्वभावच सांगतो आपलं मानसिक आरोग्य! तुमच्यात ही लक्षणे तर नाहीत ना?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Mental Health: अपयश, बदलती जीवनशैली, प्रेमप्रकरण, कामाचं प्रेशर, करिअरची चिंता, व्यवसायाची चिंता अशा एक ना अनेक कारणांमुळे लोक नैराश्याचे शिकार होत आहेत.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : आजकालच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्या वाढू लागल्या आहेत. त्यातही मानसिक आरोग्य पूर्णपणे ढासळत चालंलं आहे. अपयश, बदलती जीवनशैली, प्रेमप्रकरण, कामाचं प्रेशर, करिअरची चिंता, व्यवसायाची चिंता अशा एक ना अनेक कारणांमुळे लोक नैराश्याचे शिकार होत आहेत. विशेष म्हणजे यात तरुणपिढीचा समावेश आहे. सततच्या कामाच्या व्यापामुळे तरुणांना प्रचंड थकवा जाणवतो. यामुळे त्यांना सतत चिडचिड आणि तणावाचा सामना करावा लागतो. अनेकदा आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे आपण नैराश्याच्या खोल दरीत लोटले जाते. परंतु, अशी काही लक्षणं आहेत. जे आपण कुठेतरी नैराश्याचे शिकार झालो आहोत याची जाणीव करुन देतात. याबाबत कोल्हापूरचे प्रसिद्ध संमोहन उपचार आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उत्तम गव्हाणे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
अतीविचार : लहान लहान संकट आलं तरी हाताळता न येणे, सतत वैचारिक गोंधळ, आव्हानांपासून दूर पडणे, असुरक्षित वाटणे, काही अनपेक्षित घटना घडली की सैरभैर होणे, अशा गोष्टी मानसिक संतुलन बिघडलं आहे हे दर्शवतात. तर समस्यांकडे वस्तुनिष्टतेनं पाहणे, नियमित कम्फर्ट झोनच्या बहेर जावून विचार करणे, तसंच नेहमी जोखीम स्विकारणे या गोष्टी मानसिक दृष्ट्या बलवान असल्याचं सिद्ध करतात.
advertisement
एकटेपणा: सतत एकटं राहणं पसंत करणे, कुटुंबियांसोबत वेळ न घालवणे, माणसांपेक्षा इतर गोष्टींमध्ये रमणे, सतत एकटं कुठं तरी जावून बसणे हे मानिसक दृष्ट्या दूर्बल असल्याची लक्षणं आहेत. त्याचबरोबर सतत कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला गुंतवूण ठेवणे, संपूर्ण वेळ घरात राहणे, छंद नसणे, सुट्टी न घेणे हे मानसिक आजारांना आमंत्रण देण्याची लक्षणं आहेत.
advertisement
भूक : जेवण्याची इच्छा नसणे किंवा योग्य वेळी भूक न लागणे किंवा याउलट सतत भूक लागणे आणि अजिबात भूक न जाणवणे ही मानसिक विकाराच लक्षणं असू शकते. चिंतारोग किंवा डिप्रेशन असल्यास याचा परिणाम भूकेवर होतो. यामुळे तुमच्या बाजूला असे लोक आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
advertisement
झोप: अस्वस्थ झोप, झोपून उठल्यावरही थकवा जाणवणे, निद्रानाश हे मानसिक दृष्ट्या असंतुलन दर्शवते. असह्य ताण किंवा डिप्रेशन असल्यास झोपेची वारंवारता वाढते. तसंच मनातले विचार नियंत्रित करता येत नसतील तर झोप लागत नाही. आणि या उलट सारखी झोप येणे एकसारखं झोपून राहणं आळस अंगातून न जाण हे या विकाराचे लक्ष असू शकत. साधारण नियमित 7-8 तास शांत झोप घेणे ही निरोगी मनाचं लक्षण आहे.
advertisement
अपयश : प्रत्येक अपयशाला व्यक्तीगत मानणे, साध्या अपयशाला देखील खचून जाणे, हे मानसिक रोगांचे निर्देशक आहेत. तरुण वयातील लोकांमध्ये हे जास्त दिसून येतात. जसं की प्रेमामध्ये अपयश किंवा परिक्षेतील अपयश पचवता न येणे. हे मानसिक दृष्ट्या अप्रगल्भ असल्याचे लक्षण असू शकते.
सतत शंका घेणे : लहानसहान गोष्टींवरून व्यक्ती सतत अनावश्यक शंका घेऊ लागते. असे लोक विनाकारण त्यांच्या कुटुंबावर, मुलांवर किंवा मित्रांवर संशय घेऊ लागतात, त्यासाठी कारण काहीही असू शकतं. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल होणे किंवा काहीतरी लपवलं तर शंका घेणं ही गोष्ट कॉमन आहे. परंतु, एखाद्या व्यक्तीची सतत संशय घेण्याची सवय दुर्लक्षित करू नये.
advertisement
कारणाशिवाय रडू येणे : जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या थकता तेव्हा तुम्हाला तुमच्या भावनांवर फोकस करता येत नाही. अशा परिस्थितीत एखाद्या छोट्याशा गोष्टीचाही तुम्ही त्रास करून घेता. बऱ्याच वेळेस तुम्ही रडून तुमच्या भावना व्यक्त करता. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरही तुम्हाला रडायला येतं.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
January 29, 2025 9:10 AM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Mental Health: आपला स्वभावच सांगतो आपलं मानसिक आरोग्य! तुमच्यात ही लक्षणे तर नाहीत ना?