कार्यक्रमांमध्ये करा ट्रेंडी लूक, आई आणि मुलीसाठी सेम कपडे, डोंबिवलीमध्ये खेरदीसाठी बेस्ट ठिकाण!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
आई आणि मुलगी सारखा ड्रेस घालतात किंवा संपूर्ण कुटुंबच वाढदिवसाच्या दिवशी किंवा लग्न समारंभात सेम कपडे घालून दिसतात. तुम्हालाही तुमच्या चिमुकल्यांबरोबर असा सेम पिंचवाला ट्रेंड करायचा असेल तर तुमच्यासाठी डोंबिवलीमध्ये एक बेस्ट ठिकाण आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
डोंबिवली : सध्या अनेक कार्यक्रमांमध्ये सारखे कपडे घालण्याचा ट्रेंड आला आहे. ज्यामध्ये आई आणि मुलगी सारखा ड्रेस घालतात किंवा संपूर्ण कुटुंबच वाढदिवसाच्या दिवशी किंवा लग्न समारंभात सेम कपडे घालून दिसतात. तुम्हालाही तुमच्या चिमुकल्यांबरोबर असा सेम पिंचवाला ट्रेंड करायचा असेल तर तुमच्यासाठी डोंबिवलीमध्ये एक बेस्ट ठिकाण आहे.
advertisement
डोंबिवली स्थानकापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या डॉ. मुखर्जी रोडवरच तुम्हाला सेम पिंच नावाचे बुटीक मिळेल. धनश्री या मराठी व्यावसायिकेचे डोंबिवलीमध्ये हे स्वतःचे सेम पिंच नावाचे बुटीक आहे. या बुटीकला आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या या सेम पिंचमध्ये आई आणि मुलीसाठी सारखे कपडे शिवून मिळतात. सध्या अनेक ठिकाणी कोणताही फंक्शनमध्ये कुटुंबाने एकसारखे कपडे घालण्याचा ट्रेंड आला आहे. त्यामुळेच त्यांनी हा ट्रेंड लक्षात घेऊन स्वतःचे बुटिक सुरू केले.
advertisement
तुम्ही जर चार जणांची फॅमिली असाल तर तुमच्यासाठी हा लूक अगदी परफेक्ट ठरेल. एतकच नव्हे तर तुम्हाला थोडा बदल सुद्धा हवा असेल, थोडा फॅशनेबल हवं असेल तर असे फॅमिली सेम ड्रेसेस सुद्धा इथे शिवून मिळतील. वडिलांसाठी कुर्ता, आईसाठी सारखीच साडी आणि मुलीसाठी सुंदर असा वेगळ्या पॅटर्नचा घागरा येथे मिळेल. आई आणि मुलीचे सेम कपड्यांचे कॉम्बिनेशन तर तुम्हाला इथे खूप मिळतील.
advertisement
ब्लाऊजमध्ये सुद्धा हवा तो पॅटर्न आणि हव्या त्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज शिवून मिळेल. अगदी इथे जसं ब्लाऊजच्या मागे आई लिहिलेय तसं तुम्हीही त्यांना तुमची ऑर्डर देऊ शकता आणि तुमच्या मनाप्रमाणे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. बरं इथे ड्रेस मिळतायेत, ब्लाऊज मिळतायेत, साडी मिळतेय पण मग त्यांच्यावर लागणारे दागिने? तर हाही प्रश्न तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला भेडसावणार नाही कारण तो प्रश्नही धनश्रीनी सोडवला आहे. आता त्यांच्या या सेम पिंच बुटीकमध्ये तुम्हाला सेम प्रकारचे सुंदर असे हॅन्डमेड दागिने सुद्धा मिळणार आहेत. जो तुमचा लूक उठावदार करायला आणखी मदत करतील.
advertisement
मंडळी वाट कसली पाहताय, तुम्हालाही कुर्ती, ड्रेसेस, ब्लाउज, गाऊन, ब्रायडल वेअर, लिंगा चोली, चिल्ड्रन वेअर असे सगळे प्रकार शिवून घेण्याची इच्छा असेल तर डोंबिवलीत असणाऱ्या आमच्या सेम पिंच स्टुडिओला भेट द्या.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
March 11, 2025 7:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
कार्यक्रमांमध्ये करा ट्रेंडी लूक, आई आणि मुलीसाठी सेम कपडे, डोंबिवलीमध्ये खेरदीसाठी बेस्ट ठिकाण!