advertisement

कधीपर्यंत सोसणार? मूळव्याध मुळापासून संपवा, घरीच करू शकता सोपा उपाय!

Last Updated:

Home Remedies For Piles In Marathi: आपला देश औषधी वनस्पतींनी संपन्न आहे. आरोग्यासाठी उपयुक्त अशा विविध वनस्पती आपल्या आजूबाजूलाच असतात, आपल्याला केवळ त्यांबाबत पुरेशी माहिती नसते इतकंच.

मूळव्याधावर जालीम उपाय.
मूळव्याधावर जालीम उपाय.
बागपत : आजकाल आपली जीवनशैली एवढी धावपळीची झाली आहे की अवेळी जेवण आणि अपुरी झोप, व्यायामाचा अभाव यामुळे साठीतले आजार अगदी विशीतच जडू लागले आहेत. बाहेरच्या खाद्यपदार्थांचं अतिसेवन यामुळे सध्या ‘मूळव्याध’ हा एक सर्वसामान्य आजार झाला आहे. त्यावर वेळीच उपचार करणं आवश्यक असतं. नाहीतर शरीरातून सतत रक्त बाहेर जाणं व्यक्तीच्या जीवावरही बेतू शकतं. आयुर्वेदात मूळव्याधावर अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यापैकी एक रामबाण उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.
आपला देश औषधी वनस्पतींनी संपन्न आहे. आरोग्यासाठी उपयुक्त अशा विविध वनस्पती आपल्या आजूबाजूलाच असतात, आपल्याला केवळ त्यांबाबत पुरेशी माहिती नसते इतकंच. देशभरात अडुळसा सहज कुठेही मिळतो. आयुर्वेदात त्याला विशेष महत्त्व आहे. आपण या रोपाची लागवड घरीसुद्धा करू शकतो. अनेक आजारांवर अडुळश्याची पानं फायदेशीर असतात.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळव्याधासारख्या गंभीर आजारावर अडुळश्यामुळे आराम मिळू शकतो. तसंच ऋतूबदलांनुसार शरिराला जडणाऱ्या साथीच्या आजारांवर अडुळसा रामबाण ठरतो. या वनस्पतीचा वापर श्वसनासंबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. साधारण 2-3 दिवस खोकला येणं सामान्य आहे. परंतु जर त्यापेक्षा जास्त दिवस खोकल्याचा त्रास झाला तर तो गंभीर ठरू शकतो. अशा खोकल्यावरही अडुळश्यामुळे आराम येऊ शकतो.
advertisement
‘असा’ वापरावा अडुळसा!
आपण अडुळश्याच्या पानांची चटणी बनवून खाऊ शकता. ही चटणी मधासोबत खाल्ल्यास चांगला आराम मिळतो. तसंच आपण विविध प्रकारे या पानांचा वापर करू शकता, त्यामुळे विविध आजारांवर आराम मिळतो.
(सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरीही आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
कधीपर्यंत सोसणार? मूळव्याध मुळापासून संपवा, घरीच करू शकता सोपा उपाय!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement