Health Tips: पोट फुगणे आणि ॲसिडिटी कायमची होईल दूर, पावसाळ्यात हे फळ खाणे फायदेशीर, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
पावसाळ्याच्या दिवसांत फळ आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या फळाची आंबट-गोड चव केवळ जिभेचेच लाड पुरवत नाही, तर ते शरीराला देखील त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याच्या दिवसांत आलू बुखारा हे फळ आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या फळाची आंबट-गोड चव केवळ जिभेचेच लाड पुरवत नाही, तर ते शरीराला देखील त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. विशेष म्हणजे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या सामान्य समस्या, पोट फुगणे आणि ॲसिडिटी यांवर आलू बुखारा अत्यंत प्रभावी ठरते. अनेकदा पावसाळ्यात पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी वाढतात, अशावेळी आलू बुखाराचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आलू बुखारा खाण्याचे शरीराला काय फायदे आहेत? याविषयीचं आपल्याला डॉ. नितीन संचेती यांनी माहिती दिली आहे.
नागरिकांनी हे आरोग्यदायी फळ पावसाळ्यात सेवन केले पाहिजे. आलू बुखारातील पोषक घटक हाडांना मजबूत करण्यास आणि मधुमेहाचे नियंत्रण करण्यासही काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकतात. नियमित आणि योग्य प्रमाणात आलू बुखाराचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत आपल्या आहारात आलू बुखाराचा समावेश करणे हे एक आरोग्यदायी पाऊल ठरेल असे, डॉ. नितीन संचेती सांगतात.
advertisement
आलू बुखारा हे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आणि फायबर यांसारख्या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, ज्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण मिळते. तर फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात. या फळामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत होत असल्याचे डॉ. संचेती यांनी सांगितले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 07, 2025 10:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: पोट फुगणे आणि ॲसिडिटी कायमची होईल दूर, पावसाळ्यात हे फळ खाणे फायदेशीर, Video